तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .

News By - Sahyadri_News
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
गेल्या महिन्याभर बंद असलेला तापोळा – महाबळेश्वर रस्ता युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री विशाल भाऊ सपकाळ व शिवसेना उपतालुका प्रमुख श्री राम भाऊ सपकाळ व महाबळेश्वर तालुका पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहुन सदर रस्त्याचे ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना योग्य तो समज देवुन हलक्या वजनाच्या वाहनांची एकेरी वाहतुक आज पासुन सुरु करण्यात आली .

आज युवासेनेचे उपतालुका प्रमुख श्री विशालभाऊ सपकाळ यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहुन गेले महिनाभर बंद असलेला तापोळा महाबळेश्वर रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न केला व सदर बांधकाम ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेवुन १ महिन्यापासुन प्रलंबित असलेल्या तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे काम जलदगतीने करण्यास सांगितले . व हलक्या वजनाच्या वाहनांची एकेरी वाहतुक आजपासुनच सुरु करण्यात आली .
तापोळा महाबळेश्वर रस्ता गेल्या १ महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद होता परंतु शिवसेनेच्या धडक कार्यवाहीने सदर रस्ता हलक्या वाहनांसाठी सुरु करण्यात आला असुन कृपया कोणीही या रस्त्यावरून अवजड वजनाची वाहने या रस्त्याने घेऊन जाऊ नये असे आवाहन व विनंती शिवसेनेना युवा जिल्हाप्रमुख श्री विशालभाऊ सपकाळ यांनी केले आहे .










