Skip to content

मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद .. आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी ..

IMG-20231029-WA0000

News By - Narayan Jadhav

*मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद*
*आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी ..
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवात केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एक दिवस समाजासाठी या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शहर, उपनगर, तालुक्यातील हजारो ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येऊ लागली असून तसे फ्लेक्स झळकले आहेत. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्यावतीने बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी सातारा शहर, उपनगर व तालुक्यातील विविध गावांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजातील नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करत एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, आंदोलकांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. मराठा लोकांकडे मोठी शेतजमीन असल्याचे सांगून अनेकजण दिशाभूल करत आहेत, परंतु, पूर्वीच्या काळात दोनशे एकर असणारी जमीन आता दोन गुंठ्यावर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. होतकरू आणि गुणवंत मराठा मुलांना संधी मिळत नसल्याने कुचंबणा होत आहे. आता तरी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top