Skip to content

महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप गाडवे यांची सर्वानुमते निवड .

IMG-20260216-WA0000.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
  केळघर / नारायण जाधव .
   एसटी कामगार संघटनेच्या महाबळेश्वर आगाराच्या 2026 च्या आगार कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संदीप सुभाष गाडवे (वाहक ) यांची तर सचिवपदी   संतोष सुहास सावंत (वाहक) व कार्याध्यक्ष पदी सुदर्शन मोहन शिंदे (चालक) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महाबळेश्वर आगाराच्या कामगार संघटनेच्या वार्षिक  सर्वसाधारण सभेत ही नुतन कार्यकारिणी  निवडण्यात आली. यावेळी कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष व विभागीय अध्यक्ष  शिवाजीराव देशमुख, विभागीय सचिव अजित पिसाळ, विभागीय कार्याध्यक्ष नाना घोणे,विभागीय खजिनदार प्रकाश पाटील, सातारा आगार अध्यक्ष जनक जाधव, सातारा आगार सचिव युवराज भारती , सुशांत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कामगार संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे,उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण (वाहतूक नियंत्रक),अमोल वडगावे (वाहतूक नियंत्रक),राजाराम भिलारे (चालक),दिलीप बोराटे(चालक),केशव घाडगे(चालक),वर्षा लोहकरे(वाहक).
सहसचिव पदी अजित जमदाडे (वरिष्ठ लिपिक),योगेश पारखी(वाहक),सुधीर राजपुरे(वाहक),योगेश शेडगे(वाहक),अमोल डुबल(चालक),नितीन गायकवाड(चालक),विष्णू चव्हाण (चालक),विक्रम पडगळ(सहायक) यांची निवड करण्यात आली आहे.
खजिनदार पदी सारंग दळवी(सहायक)व संघटक सचिव सचिन शिंदे (चालक) यांची निवड करण्यात आली आहे. विभागीय प्रतिनिधी म्हणून संजय निकम (वाहतूक नियंत्रक)तर विशेष सल्लागार पदी बबनराव दुदुसकर व चंद्रकांत वळकुंदे यांची निवड करण्यात आली आहे.कार्यकारिणी सदस्य म्हणून अभिजीत दवंडे,लक्ष्मण खुडे, संदेश घाडगे, सचिन ससाणे, तानाजी गोंजारी, सोमनाथ क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.नुतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच मेढा नगरपंचायतच्या नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल शिवाजीराव देशमुख यांचा महाबळेश्वर आगार कामगार संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व कामगारांना सोबत घेऊन संघटनेच्या वाढीसाठी काम करणार असल्याचे नुतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाबळेश्वर आगाराच्या कामगार संघटनेच्या नुतन कार्यकारिणीचे  कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हणमंतराव ताटे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

डिजिटल मीडिया संपादक  पत्रकार संघटनेच्या वाई तालुकाअध्यक्षपदी बापू वाघ  यांची निवड
आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
Scroll To Top