Skip to content

पर्यावरणाच्या  रक्षणासाठी १ लाख बियांचे संकलन, झाडांची बँक –
सुरेश पार्टे, प्राजक्ता पार्टे यांचा अनोखा उपक्रम……

IMG-20260604-WA0015.jpg

News By - Sahyadri_News


*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा /नारायण जाधव .
    जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांच्या १ लाख   बियांचे  संकलन तसेच झाडांची बँक तयार करून त्यांचे वृक्षारोपन करण्याचा संकल्प वेण्णामाई पतसंस्थेचे अध्यक्ष / पत्रकार सुरेश पार्टे व मेढा नगरपंचायतीच्या नगरसेविका कु.प्राजक्ता पार्टे यांनी केला आहे.   
        हि मोहिम ५ जुन पासुन सुरु करण्यात येत आहे. ज्या झाडांच्या बिया जमा होतील त्यांचे शक्य तेवढे जास्तीत जास्त सिडबॉल तयार करून जावली तालुक्यातील सहयाद्रीच्या डोंगररांगा मध्ये रुजण्यासाठी टाकण्यात येणार आहेत.  

 जावली तालुक्यातून बिया संकलनासाठी मुलांच्या साठी स्पर्धा आयोजीत केली असून लहान गट व मोठा गट   अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी कमीतकमी १ हजार बियांचे  उद्दिष्ट असून यासाठी प्रथम क्रमाला -११००/_ रु., द्वितीय – ७०० /- रु व तृतीय क्र. ५०० /- रु. रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. यास्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठल्याही रानटी तसेच फळ झाडांच्या बिया ५ जुन ते ५ जुलै या महिनाभराच्या कालावधी मध्ये  जमा करावयाच्या आहेत.
        तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून पर्यावरण रक्षणासाठी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन सुरेश पार्टे, प्राजक्ता पार्टे यांनी केले आहे.   

झाडांची बँक……   
 
        या मोहिमेमध्ये आपण झाडांची बँक सुरु करीत आहोत.त्यासाठी आपला, आपल्या प्रियजनांचा वाढदिवस स्मृतीदिन, आपला अत्यंत आनंदाचा क्षण यांची आठवण म्हणून या प्रसंगी आपण एक झाडं आमच्या झाडाच्या बँकेत जमा करावयाचे आहे.  महाविद्याल,विद्यालय, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, विविध मंडळांचे सभासद, शिवाजीनगर, मेढा महिला मंडळ यांच्या सहकार्याने जमा होणाऱ्या झाडांचे वृक्षारोपन दाते व्यक्तीच्या नांवासह योग्य जागेमध्ये करण्यात येणार आहे. झाडांच्या रूपाने आपल्या आठवणी कायम जीवंत तर राहातीलच शिवाय पर्यावरणाचे रक्षणासाठी आपला हातभार ही लागेल. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपला व आपल्या प्रियजनांचा वाढदिवस, स्मृतिदिन या प्रसंगी एक व त्यापेक्षा जास्त झाडे ( वड, पिंपळ,व अन्य ) आमच्या झाडांचे बँकेत जमा करावीत.      पर्यावरण रक्षणासाठीचा हा छोटासा प्रयत्न असून वरील दोन्ही मोहिमेमध्ये जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसह सुज्ञ नागरीकांनी सहभागी होवून मोहिमेस सहकार्य  करावे असे आवाहन  वेण्णामाई पतसंस्थेचे अध्यक्ष / पत्रकार सुरेश पार्टे, नगरसेविका  प्राजक्ता पार्टे यांनी केले आहे.
  अधिक माहितीसाठी ९४२३२६४२०५ /  ७२१९१२७७६८,/९९७५०५७५८२ या मोबाईल वर संपर्क साधावा व बियांचे व झाडांचे संकलन सुरेश पार्टे आर्टस्, प्राजक्ता कलेक्शन,…बसस्थानकासमोर मेढा ता. जावली येथे करावे. असे सुचित करण्यात आले आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

केळघर विकास सेवा सोसायटीच्या संचालकपदी नारायण जाधव (भाऊ ) यांची बिनविरोध निवड…
महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप गाडवे यांची सर्वानुमते निवड .
डिजिटल मीडिया संपादक  पत्रकार संघटनेच्या वाई तालुकाअध्यक्षपदी बापू वाघ  यांची निवड
आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
Scroll To Top