Skip to content

मेढ्यातील एसटी आगारात टॉयलेटला पाणीच नाही .. प्रवाश्यांचे हाल तर टँकरला निधीच नाही पवारांची माहिती ..

IMG-20231124-WA0248

News By - Narayan Jadhav

मेढ्यातील एसटी आगारात टॉयलेटला पाणीच नाही
प्रवाशांचे हाल तर टँकरला निधी नाही पवारांची माहीती .
*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा /प्रतिनिधी .
मेढा येथिल एसटी डेपो आगारात पिण्याच्या पाण्यापासून टॉयलेटच्या पाण्यापर्यत गैरसोय असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तर पाण्याचा टँकर मागविण्यासाठी निधी नसल्याचे वाहतुक नियंत्रक अमर पवार यांनी सांगीतले.
सध्या कार्तिकीवारी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या असते. यामध्ये कार्तिक वारीसाठी महाड, रायगड या भागातील भाविकांची संख्या मोठी असून सातारा – मेढा – महाबळेश्वर मार्गे वाहतुक करणे सोयीचे होत असल्याने एसटी महामंडळाच्या सर्व गाड्या महाडकडे जाताना मेढा आगारात थांबत आहेत. परंतु आगारात पिण्यासह टॉयलेटला पाणीच नसल्याचे दिसून आल्याने वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
एसटीने प्रवास करून महामंडळाचे उत्पन्न वाढविणाऱ्या प्रवाशांना आगारातील पाण्याच्या गैरसोयीचा फटका बसला. सध्या मेढा नगर पंचायतीकडून होणारा पाणी पुरवठा गेले पंधरा दिवसा पासून कमी जादा प्रमाणात होत असून अजूनही नियमित पाणी पुरवठा करण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे.
गत अनेक दिवस पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना मेढा आगाराकडून टँकरने पाणीपुरवठा करून प्रवशांना सेवा पुरविणे गरजेचे होते. राज्यामध्ये मेढा आगाराने क्रमांक पटकविला असताना सेवा पुरविण्यात आगार कुचकामी ठरली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
याबाबत आगार प्रमुखांशी संपर्क केला असता टँकरने पाणी मागवून प्रवाशांची सोय करण्याचे आश्वासन आगार प्रमुख यांनी दिले असले तरी आगार प्रमुखांच्या सांगण्याला कोलदांडा दाखवत वाहतुक नियंत्रक अमर पवार यांनी मात्र टँकरला निधी उपलब्ध नसल्याने पाणी कोठून दयायचे असा प्रश्न उपस्थित करीत बिले मंजुर करत नसल्याचा वरिष्ठांवर आरोप बोलताना केला. त्यामुळे आगार प्रमुख सांगतात टँकर आणू तर कर्मचारी म्हणतात निधीच नाही अशा द्विधा परिस्थितीत मात्र प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालुन मेढा आगारातील पाणी प्रश्न मिटवावा अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे. आगारातील टॉयलेट कायमच बंद ठेवुन प्रवाशांची गैरसोय करणाऱ्यांनी प्रवाशांसाठी टॉयलेटचे टाळे काढावेत अशीही मागणी होत आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top