Skip to content

जावलीच्या सकल मराठा समाजाची मराठा आरक्षण मागणीसाठी मेढ्यात दुचाकी रॅली , तहसीलदार व सपोनी संतोष तासगांवकर यांना दिले निवेदन ..

IMG-20231031-WA0029

News By - Narayan Jadhav

 जावलीच्या सकल मराठा समाजाची मराठा आरक्षण मागणी साठी मेढ्यात दुचाकी रॅली ,तहसिलदार व सपोनी संतोष तासगावकर यांना दिले निवेदन ..
सह्याद्री न्युज स्टार ११
मेढा / प्रतिनिधी .
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे, राजकीय नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे काल सोमवारी जावळीची राजधानी मेढा येथे मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळावे यासाठी जिवाची बाजी पणाला लावणारे मराठा योद्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देणेसाठी सुमारे हजारो सकल मराठा समाज जावली बांधवांनी मेढा शहरातून दुचाकी रॅली काढली.
आंदोलनाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी योग्य ती काळली घेतली होती .
सर्वप्रथम मेढा नगरीचे ग्राम दैवत भैरवनाथाचे मंदिरामधे सर्व मराठा बांधव एकत्र आले त्यानंतर ही दुचाकी रॅली भैरवनाथ मंदिर मेढा – कुंभारवाडा – वेण्णा हायस्कूल – वेण्णा चौक – आंबेडकर नगर चौक – एस टी डेपो – शिंदे कोयना हॉटेल मार्गे तहसीलदार यांना निवेदन दिले त्यानंतर चांदणी चौक – गणपती मंदिर – सिव्हिल हॉस्पिटल मार्गे मेढा पोलीस स्टेशन ला निवेदन देवून रॅली छत्रपती शिवाजी महाराज बाजार चौक मेढा येथे आली .


‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा ‘ अशी जोरदार घोषणाबाजी या रॅलीमध्ये करण्यात आली. या रॅलीने संपूर्ण मेढा शहर भगवेमय झाले होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पदाधिकारी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जावळीतील मराठ्यांची वाघीण कुमारी अक्षदा तरडे बामणोली हीने आपलं परखड मत व्यक्त केले .
शिवभक्त शुभम तरडे म्हणाले मराठ्यांनो आताच जागे व्हा नाहीतर तुम्हाला असेच मरावं लागेल अस परखड मत मांडले
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जावली तालुका अध्यक्ष दादा करंदकर म्हणाले कोणीही मतदानावर बहिष्कार न टाकता अरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात उभे रहा
जो पर्यत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही म्हणून शिवसैनिक सचिन जवळ ,सचिन करंजेकर,जितिन वेंदे, नामदेव चिकणे इतर पदाधिकार्यानी आपले पदाचे राजीनामा दिले
दत्ता पवार मंदाकिनी भिलारे,महेश पवार ,सुरेश पार्टे, सचिन करंजेकर शिवाजीराव देशमुख , शुभम तरडे, मारुती चिकणे बजरंग चौधरी चंद्रकांत धनावडे,मेढा नगरीचे मागदर्शक पांडूरंग जवळ विलास बाबा जवळ यांनी मनोगत व्यक्त केले.
[ आरक्षणाचे घोंगडे फार काळ भिजत ठेवू नका,आरक्षणाच्या संदर्भात त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा विलास बाबा जवळ यांनी दिला . ]

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top