Skip to content

जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..

IMG-20231125-WA0322

News By - Narayan Jadhav

जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि.दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर …
* सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा / प्रतिनिधी ..
जावली तालुका पत्रकार संघ जावळीचे कार्याघ्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल पत्रकार सादिक सय्यद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुस्तकांचं गाव भिलर येथील लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या बैठकीत हा पत्रकारितेतील पुरस्कार समितीने जाहीर केला. सादिक सय्यद सातारा जिल्ह्याचे दै प्रभात मध्ये पत्रकार म्हणून काम करीत असून या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडण्याचा व्यासंग सदैव जोपासला आहे . तर आपल्या लेखणीच्या द्वारे समाजातील विविध घटकांच्या समस्या त्यांनी मांडल्या असून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचा पाठपुरावा हा पत्रकारीतेतील मोठा गुण आहे .
या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजपूरे, उपाध्यक्ष प्रवीण भिलारे, सचिव राजेंद्र भिलारे आबा , खजिनदार सुरेंद्र भिलारे ,प्रशांत भिलारे आदी उपस्थित होते.�पत्रकार सादिक सय्यद यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पत्रकारिता, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top