Skip to content

डॉ . पल्लवी पवार हिचा यथोचित सन्मान .

IMG-20250608-WA0004.jpg

News By - Sahyadri_News


केळघर / नारायण जाधव .
  कै देवबा (आप्पा) पवार यांची नात व बदेवाडी ( भुईंज ) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विकास पवार यांची कन्या डॉ . पल्लवी विकास पवार हिने कृष्णा विश्व विद्यापीठ (कराड , युनिव्हर्सिटी ) चे सर्वोत्कृष्ठ विद्यार्थीनीचे ” सुवर्ण पदक ” व डेंटल सर्जन (BDS ) मधील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थीनीचे सुवर्ण पदक मिळवून डेंडल सर्जन होण्याचा बहुमान प्राप्त केलेबद्दल तिचा यथोचित सन्मान करण्यात आला .


  बदेवाडी ( भुईंज ) येथील स्वरा मंगल कार्यालयात बदेवाडी , भुईंज ग्रामस्त , समस्त पवार परिवार ,विकास पवार मित्र समुह व समाज्याच्या वतीने डॉ पल्लवीच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मा .जि . प . सदस्य शशिकांत पवार , भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडी सेलचे राज्य सरचिटनिस श्री राजु  साळुंखे , श्री अनिल पवार , रा .प . महामंडळाचे निवृत्त जनरल मॅनेजर श्री बी .एस .जाधव , सहाय्यक विक्रीकर आयुक्त श्री दत्ता मोहिते , डॉ . रोहिनी शिंदे , डॉ . निती शहा , डॉ स्नेहल मोहिते , पत्रकार नारायण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी डॉ पल्लवी पवार हिचा उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते सत्कार करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी उपस्थितांचे स्वागत श्री विकास पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ पल्लवी पवार यांनी मानले .
कार्यक्रमास माऊली बिगर ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन श्री हनमंतराव पवार (सर ) व सर्व संचालक , अमृतवाडी खाण संघटनेचे अध्यक्ष श्री कमलाकर बाबर , उपाध्यक्ष श्री राजेंद्र ईथापे ‘ सौ दिपिका माने , कल्पना शिंदे , अर्चना साळुंखे , सरस्वती अकॅडमीचे राहुल माने , श्री राहुल माने , दिलिप ननावरे , रमेश नायर , बाळकृष्ण पवार , महेश शिंदे यांचे सह विकास पवार मित्र समुह व पवार परिवार यांचे सह बदेवाडी ( भुईज ) ग्रामस्थ व समाजबांधव उपस्थित होते .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मेढ्यातील एसटी आगारात टॉयलेटला पाणीच नाही .. प्रवाश्यांचे हाल तर टँकरला निधीच नाही पवारांची माहिती ..
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ( अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा. धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड ..
बोंडारवाडी ग्रामस्थांची धरणाच्या सर्वेला मान्यता .. सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे मध्यस्थीला यश ..
श्री नामदेव जुनघरे यांना शैक्षक्षिण कार्याबद्दल जावली गौरव पुरस्कार …
जावलीच्या सकल मराठा समाजाची मराठा आरक्षण मागणीसाठी मेढ्यात दुचाकी रॅली , तहसीलदार व सपोनी संतोष तासगांवकर यांना दिले निवेदन ..
मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद .. आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी ..
*”मी माझ्या पगारावर समाधानी”* सतीश बुद्धे यांच्या “त्या” पाटीची जोरदार चर्चा ,सातारा पंचायत समिती प्रामाणिक लोकसेवक आल्याने समाधान …
सातारा जिल्ह्यातील मतदार शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहतील .. डॉ . सतिश बाबर …
सातारा शहरातील ३ रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणासाठी २५ कोटी.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पाठपुरावा . नगरोत्थान योजनेतून मिळवला निधी ..
पोलिस व महसुल विभागाने समन्वयाने काम करावे .. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ..
Scroll To Top