Skip to content

मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद .. आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी ..

IMG-20231029-WA0000

News By - Narayan Jadhav

*मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद*
*आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी ..
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवात केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एक दिवस समाजासाठी या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शहर, उपनगर, तालुक्यातील हजारो ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येऊ लागली असून तसे फ्लेक्स झळकले आहेत. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्यावतीने बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी सातारा शहर, उपनगर व तालुक्यातील विविध गावांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजातील नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करत एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, आंदोलकांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. मराठा लोकांकडे मोठी शेतजमीन असल्याचे सांगून अनेकजण दिशाभूल करत आहेत, परंतु, पूर्वीच्या काळात दोनशे एकर असणारी जमीन आता दोन गुंठ्यावर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. होतकरू आणि गुणवंत मराठा मुलांना संधी मिळत नसल्याने कुचंबणा होत आहे. आता तरी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल
आंबेघर तर्फ मेढा येथे झालेल्या भिषण आपघातात वरोशी ता जावली येथील एका युवकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी .. वरोशी गावावर शोककळा..
आ .शिवेद्रसिंहराजे भोसले यांना मत्रीमंडाळात संधी मिळावी म्हणून बाबाराजे समर्थक केळघर विभागाच्या वतीने उत्तराखांड येथे केदारनाथ बाबांना साकडे .
आपली वर्तणूक चांगली असेल तर चांगलेच घडते प्रा . संध्या चौगुले .
केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा उद्योजक श्री सुनिल जांभळे (नाना ) यांची निवड झालेने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला यथोचित सत्कार ..
मेढा नगरपंचायतीच्या करवाढीच्या विरोधात आत्मदहन करावे लागेल .. सुरेश पार्टे .
वुडनिचर इंटेरिअर स्टुडिओच्या माध्यमातुन मेढ्यासह संपूर्ण जावली तालुक्यात सुबक व दर्जेदार कामाची खात्री .. आ. शिवेंद्रसिहराजे भोसले .
जावली तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध . आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले . 
श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघरचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश . .
मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्टस, जलपर्यटनाला मंजुरी . आ शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश राज्य शासनाकडून ४५ . ३८ कोटी रुपये मंजुर .
Scroll To Top