आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..

News By - Sahyadri_News
केळघर / नारायण जाधव .
महाबळेश्वर ते विटा महामार्गावर आपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असुन आसणी तळ ते आंबेघर तर्फ मेढा दरम्यान आपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले असुन येथील प्रसिद्ध असलेल्या रामजीबाबा मंदिराच्या येथील ब्रिटीशकालीन पुल्याच्या एका बाजुने भवस गवत प्रचंड प्रमाणात वाढले असुन केळघरहून मेढ्याच्या बाजुने जाणाऱ्या वाहनाला रस्त्याच्या पलीकडे काहीज दिसत नसल्याने या कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात आपघातास निमंत्रण मिळत आहे तर पुलाच्या पलिकडच्या बाजुस कठडा तुटल्याने आपघात होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणात आहे .

सध्या पावसाचे दिवस असल्याने केळघर घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असुन अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने आपघाताचे प्रमाण वाढले आहे . तर रामजीबाबा मंदिराच्या पूलादरम्यानचा भवस गवत संबंधीत विभागाने ताबडतोब काढावा अशी मागणी वाहनधारकांमधुन होत आहे .
फोटो : १)आंबेघर येथील रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण . २ ) समोरच्या दिशेने कठड्याची बाजु खचल्याने आपघात होण्याची शक्यता .छाया : नारायण जाधव .










