श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल

News By - Sahyadri_News
केळघर / नारायण जाधव .
केळघर ता .जावली येथील श्री शंकरराव जांभळे (गुरुजी ) व उदयोजक श्री सुनिल जांभळे (नाना) या बंधुंनी आपल्या मातोश्री पार्वती श्रीपती जांभळे यांच्या स्मृती पित्यार्थ केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वेगवेगळ्या वृक्षांची लागवड केली असुन या बंधुंचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे प्रतिपादन मा . विस्तारअधिकारी सौ . कल्पना तोडरमल यांनी केली .

” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ” या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकात आई चे महत्व संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे केळघर येथील जांभळे कुंटुंबाचा आधारवाड असलेल्या श्रीमती पार्वती जांभळे यांचे वृद्धापकाळे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते . त्यांचे पुत्र प्राथमिक शिक्षक श्री शंकरराव जांभळे व उदयोजक सुनिल जांभळे (नाना) यांनी त्यांच्या मोतोश्रींच्या स्मृती पित्यर्थ केळघर येथे वृक्षारोपण केले . यावेळी मा विस्तारअधिकारी सौ कल्पना तोडरमल केळघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शोभा धनावडे , डॉ अशोक पाटील , दिपक गायकवाड , सुनिल धनावडे , समृद्धी रिसॉर्टचे सचिनशेठ पार्टे, केळघरचे मा उपसरपंच सचिन बिरामणे , युवा उदयोजक अंकुश बेलोशे , बाजीराव पार्टे , सुनिल बिरामणे , अमोल जाधव , योगेश शेलार , बाळासाहेब कडव , सुनिल बिरामणे ,संजय काटेकर यांचेसह युवक उपस्थित होते . फोटो : केळघर ता .जावली येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करताना सौ कल्पना तोडरमल , शंकरराव जांभळे , शोभा धनावडे आदी . छाया : नारायण जाधव .










