जावली तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध . आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .

News By - Sahyadri_News
स्व . विजयराव मोकाशी यांचे बोंडारवाडी धरणाचे स्वप्न सत्यात उतरवणार . .
सहयाद्री न्युज स्टार ११
केळघर / नारायण जाधव .
केळघर , विभागातील पाणी टंचाईचे दुर्भिक्ष कायमस्वरूपी जावे यासाठी व स्व . विजयराव मोकाशी यांनी जे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरविण्यासाठी ,बोंडारवाडी धरणाच्या निर्मितीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे . बोंडारवाडी धरणाबरोबरच जावलीच्या विकासासाठी जे जे गरजेचे आहे ते करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली .

श्री स्वामी समर्थ मंगलकार्यालय नांदगणे (केळघर ) येथे बोंडारवाडी धरण कृती समिती व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आयोजित केळघर मेढा परिसरातील ५४ गावातील ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर, माजी आ . सदाशिवभाऊ सपकाळ, आनंदराव जुनघरे, वैभव ओंबळे , रामभाऊ शेलार ,मोहनराव कासुर्डे , आदिनाथ ओंबळे , जगन्नाथ जाधव , नारायण सुर्वे , नारायण धनावडे , राजू जाधव, पांडूरंग धनावडे ,नंदकुमार बावळेकर , भिमराव किळगणे , एकनाथ सपकाळ , विनोद शिंगटे , आनंदा जुनघरे , श्रीरंग बैलकर , विलास शिर्के , मोहन भणगे आदि मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आ भोसले पुढे म्हणाले, ना . अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत बोंडारवाडी धरणासाठी एक टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवला आहे तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीतही बोंडारवाडी धरण निर्मितीसाठी मी सातत्याने प्रयत्न करत असून संबंधित अधिकारी, बोंडारवाडी ग्रामस्थ यांच्याशीही वेळोवेळी बैठका घेत या परिसरातील जनतेचा कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये . तसेच धरणाच्या निर्मिती बरोबरच बंदिस्त पाईपलाईन , तसेच ज्यांचे क्षेत्र या धरणात जाणार आहे त्यांना पुनर्वसनाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे . आता बोंडारवाडी धरण कृती समिती व आपण सर्वजण एकत्र प्रयत्नशील असून त्यामुळे स्व . विजयराव मोकाशी यांचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार आहे .
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर म्हणाले, आता धरणासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत त्यामुळे धरणासाठी काही अडचण नाही .येणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर बोंडारवाडी धरणासाठी निधी उपलब्ध करणे व निविदा प्रक्रिया होण्यासाठी आ शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि कृती समितीची बैठक मंञालय पातळीवर घेऊन पुढील कामाला गती मिळण्यासाठी प्रयत्न करू .

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते स्व . विजयराव मोकाशी यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले . प्रास्ताविक आदिनाथ ओंबळे यांनी केले . सूत्रसंचालन एकनाथ सपकाळ यांनी केले तर श्रीरंग बैलकर यांनी आभार मानले . कार्यक्रमास केळघर मेढा परिसरातील ५४ गावातील ग्रामस्थ , महिला , तसेच भेकवली , मेटगुताडचे ग्रामस्थ,मुंबई , पुणेस्थित जावलीकर उपस्थित होते .
( स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांच्या बोंडारवाडी कृती समितीच्या रूपाने आज वटवृक्ष झाल्याचे पहावयास मिळाले मी धरणानाला गती आनण्यासाठी २०फेब्रुवारी मंत्रालयात बैठक लावून पुढील निर्णय लवकर घेण्यास भाग पाडतो )
(आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालय येथे २० फेब्रुवारीला बैठक लावत आहेत त्या बैठकीमध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात आले तर २७ फेब्रुवारीला विजय मेळावा होईल २० फेब्रुवारीला जर पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही तरी २७ तारखेला लॉग मार्च निर्णय घेतला जाईल – डॉ. भारत पाटणकर )










