Skip to content

आंबेघर तर्फ मेढा येथे झालेल्या भिषण आपघातात वरोशी ता जावली येथील एका युवकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी .. वरोशी गावावर शोककळा..

IMG-20240628-WA0035

News By - Sahyadri_News

केळघर / नारायण जाधव .

आंबेघर तर्फ मेढा येथील मुख्य रस्त्यावर स्विप्ट कारने दुचाकिस धडक दिल्याने वरोशी ता . जावली येथील एका युवकाचा जागेवरच मृत्यु झाला तर दुसऱ्या युवकावर सातारा येथे उपचार सुरू आहेत . याबाबत घटनास्थळावरून व पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार अधिक माहिती अशी की वरोशी ता जावली येथील युवक प्रविण कोंडीबा कासुर्डे वय ३७ हे लुना टिव्हीएस क्र एम एच ११ Y ५२८३ या गाडीवरून दुध घालण्यासाठी मेढा येथे चालले होते त्यांची गाडी आंबेघर तर्फ मेढा येथील बस स्टॉपच्या पुढील बाजुस आली असताना अचानक महाबळेश्वर कडे जाणाऱ्या स्विफ्ट कार क्र . एम एच ४३ L ३७५० या कार वरील चालक सतीश दगडु सावले रा . भामघर ता जावली जि. सातारा याने आपल्या ताब्यातील नमुद कार हयगयीने व निष्काळजीपणाने चालवून रस्त्याच्या पलीकडे दुर्लक्ष करून भरदाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या मोटरसायलला जोरदार धडक दिली .

या आपघातात दुचाकीवरील प्रविण कोंडीबा कासुर्डे या युवकाचा जागीच मृत्यु झाला तर त्याच्या मागे बसलेल्या सिद्धार्थ संतोष कदम वय १७ वर्षे हा युवक गंभीर जखमी झाला त्यास पुढील उपचारासाठी सातारा येथे नेण्यात आले आहे . दोन्ही युवक हे गरीब कुटुंबातील असुन प्रविण हा दुग्धव्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत होता त्याच्या पश्चात आई वडिल भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार असुन सिद्धार्थ हा एकुलता एक मुलगा आहे तो गंभीर जखमी आहे . या आपघाती घटनेने वरोशी गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . सदर घटनेची नोंद मेढा पोलिस स्टेशनला झाली असुन याबाबत मेढा पोलीस ठाणे येथे स्विफ्ट वरील चालक याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास मा . सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील या तयास करीत आहेत.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

पर्यावरणाच्या  रक्षणासाठी १ लाख बियांचे संकलन, झाडांची बँक –
सुरेश पार्टे, प्राजक्ता पार्टे यांचा अनोखा उपक्रम……
केळघर विकास सेवा सोसायटीच्या संचालकपदी नारायण जाधव (भाऊ ) यांची बिनविरोध निवड…
महाबळेश्वर आगार एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप गाडवे यांची सर्वानुमते निवड .
डिजिटल मीडिया संपादक  पत्रकार संघटनेच्या वाई तालुकाअध्यक्षपदी बापू वाघ  यांची निवड
आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
Scroll To Top