Skip to content

मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..

IMG-20230807-WA01991

News By - Narayan Jadhav

मैत्रीदिनी “एक झाड मैत्रीचं” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण…
मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम..
* सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा सर्वत्र मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. याच मैत्रीदिनाचे औचित्य साधून “एक झाड मैत्रीचं” हा संदेश देत डांगरेघर ता. जावली येथे मित्रमेळा फाउंडेशन जावली व ग्रामपंचायत डांगरेघर यांच्यामाध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या रस्त्याच्या दुतर्फा तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवारी सर्वत्र मैत्रीदिन उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी जुने मित्र एकमेकांना भेटतात, मैत्रीच्या आठवणी ताज्या करत आयुष्याच्या शेवटपर्यंत मैत्री न तोडण्याची वचने एकमेकांना देत विविध पद्धतीने मैत्रीदिन साजरा करतात. मात्र मैत्रिदिनाच्या या जुन्या संकल्पनांना फाटा देत जावली तालुक्यातील मित्रमेळा फाउंडेशन व ग्रामपंचायत डांगरेघर यांनी यावर्षीचा मैत्रीदिन हा निसर्गासोबत साजरा केला आहे. मैत्रीदिनाचे औचित्य साधत मित्रमेळा फाउंडेशन व ग्रामपंचायत डांगरेघर यांनी एक झाड मैत्रीचं या संकल्पनेखाली डांगरेघर गावातून धावली गावाला जाणाऱ्या रस्त्याला तसेच गावच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण केले आहे. यावेळी पिंपळ, जांभूळ, करंज, बेल, शेवगा, कवट, आवळा इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच यावेळी गावात असणाऱ्या प्राथमिक शाळेतील मुलांना सुद्धा झाडे भेट देण्यात आली. यावेळी या वृक्षारोपन कार्यक्रमासाठी मित्रमेळा फाउंडेशन तसेच डांगरेघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:
सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून निसर्गाची खूप हानी होत आहे. जे विकासक झाडे तोडतात ते झाडे लावताना मात्र दिसत नाहीत. तसेच वणव्यामुळे सुद्धा हजारो झाडे नष्ट होतात. त्यामुळे वृक्षारोपण हि काळाची गरज असून पुढच्या पुढच्या पिढयांचे स्वास्थ बळकट करायचे असेल तर निसर्गसंवर्धन खूप महत्वाचे आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक झाड मैत्रीचं म्हणत रविवारी शेकडो झाडे लावली गेली. तशीच समाजातील प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करत वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे.
प्रवीण पवार
अध्यक्ष मित्रमेळा फाउंडेशन

फोटो: डांगरेघर : वृक्षारोपण करताना मित्रमेळा फाउंडेशनचे सदस्य व डांगरेघर ग्रामस्थ ( छाया नारायण जाधव )

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..
मेढ्यातील एसटी आगारात टॉयलेटला पाणीच नाही .. प्रवाश्यांचे हाल तर टँकरला निधीच नाही पवारांची माहिती ..
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ( अजितदादा पवार गट ) मेढा शहराध्यक्षपदी मा. धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड ..
बोंडारवाडी ग्रामस्थांची धरणाच्या सर्वेला मान्यता .. सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे मध्यस्थीला यश ..
श्री नामदेव जुनघरे यांना शैक्षक्षिण कार्याबद्दल जावली गौरव पुरस्कार …
जावलीच्या सकल मराठा समाजाची मराठा आरक्षण मागणीसाठी मेढ्यात दुचाकी रॅली , तहसीलदार व सपोनी संतोष तासगांवकर यांना दिले निवेदन ..
मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद .. आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी ..
*”मी माझ्या पगारावर समाधानी”* सतीश बुद्धे यांच्या “त्या” पाटीची जोरदार चर्चा ,सातारा पंचायत समिती प्रामाणिक लोकसेवक आल्याने समाधान …
सातारा जिल्ह्यातील मतदार शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहतील .. डॉ . सतिश बाबर …
सातारा शहरातील ३ रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणासाठी २५ कोटी.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पाठपुरावा . नगरोत्थान योजनेतून मिळवला निधी ..
Scroll To Top