Skip to content

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .

IMG-20250801-WA0013.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
मेढा / नारायण जाधव .
    

         जावली तालुक्याचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री मा. जलसंपदा मंत्री, आ. शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. कलश मंगल कार्यालय मेढा येथे तमाम जावलीकर व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधान सभा अध्यक्ष सुरेश पार्टे यांनी दिली.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली तालुक्याचे नाव साता समुद्रा पलीकडे पोहोचवणारे अनेक हिरे रत्न तयार झाले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात जावलीचा वाघ असे गौरवोद्गार ज्यांच्यामुळे निघतात ते माथाडी कामगार नेते तथा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांचा तमाम जावलीकरांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यासाठी तालुक्याची राजधानी असलेली मेढा नगरी सज्ज झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने जावलीचे राजकारण उदयास आले.जावळीचे सुपुत्र बाबासाहेब आखाडकर,कृष्णाराव तरडे,स्व.भिलारे गुरुजी, जी.जी. कदम, लालसिराव शिंदे यांनी काँग्रेस विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम ठेवली. त्यामध्ये हुमगाव ता. जावळीचे सुपुत्र आ. शशिकांत शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. १९९५ साली शिवसेनेचे सदाशिवभाऊ सपकाळ या सामान्य शिवसैनिकाने इतिहास घडवला.त्यामुळे जावलीचे नाव आदराने घ्यावे लागते. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी जावली सह कोरेगाव मतदारसंघातही त्यांनी आपल्या नेतृत्वाची चूणूक दाखवली आहे.महाराष्ट्रात सर्व परिचित असलेले ते एकमेव नेते आहेत. जावली तालुक्याचे सुपुत्र मा. जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री आ.शशिकांत शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल तमाम जावळीकरांच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार दि. ४ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. मेढा नगरीतील कलश मंगल कार्यालय मध्ये भव्य दिव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून सत्काराची जय तयारी पूर्ण झाली आहे.


जावळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच , विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी हे राजकीय मतभेद विसरून सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आ. शशिकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराची गेल्या पंधरा दिवसापासून जयंती तयारी सुरू आहे.सदरचा कार्यक्रम राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्ह्यातील व तालुक्यातील महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थीती मध्ये संपन्न होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्कार समिती मधील सर्व पदाधिकारी, काार्य कार्ययकर्ते परिश्रम घेत आहेत .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..
Scroll To Top