सातारा शहरातील ३ रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणासाठी २५ कोटी.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पाठपुरावा . नगरोत्थान योजनेतून मिळवला निधी ..

News By - Narayan Jadhav
- सातारा शहरातील ३ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी २५ कोटी
आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; नगरोत्थान योजनेतून मिळवला निधी..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
सातारा प्रतिनिधी ..
सातारा शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून सातत्याने निधी उपलब्ध करून देणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून शहरातील ३ रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी तब्ब्ल २५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार राज्याच्या नगर विकास विभागामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतून हा निधी उपलब्ध झाला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
सातारा शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५० कोटींचा निधी देण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याचवेळी ना. फडणवीस यांनी निधी देण्यास सकारात्मकता दर्शवली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार सातारा पालिकेने तसा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर केला होता. त्यांनतर आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने या निधीला मान्यता दिली असून या निधीतून सातारा शहरातील ३ रस्ते लवकरच काँक्रीटचे केले जाणार आहेत.सातारा शहरातील मध्यवर्ती असेलेले जुना आरटीओ ते सुभाषचंद्र बोस चौक, सादरबझार येथील सुमित्राराजे गार्डन ते कूपर बंगला आणि मोना स्कुल ते लोणंद रोड या तीन रस्त्यांचे काँक्रीटीकरण मंजूर निधीतून होणार आहे. या तीनही रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार असल्याने हे तीनही रस्ते चकाचक होणार आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून उर्वरित २५ कोटी रुपयांचा निधी लवकरच मजूर होईल आणि त्यातून शहरातील अन्य महत्वाचे रस्तेही काँक्रीटचे होतील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. .











