जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..

News By - Narayan Jadhav
जेष्ठ पत्रकार प्रा तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
*केळघर / नारायण जाधव*
जेष्ठ पत्रकार प्रा. तुकाराम ओंबळे यांचा ७४ वा वाढदिवस सातारा येथील आशा भवन संचलित अपंग विद्यालयात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्रीधर साळुंखे यांचे हस्ते व समाजसेवक एकनाथ ओंबळे, प्रा. शरद गायकवाड व नायब तहसीलदार संजय बैलकर यांचे प्रमुख उपस्थितीत व चंद्रकांत देवरुखकर यांच्या सप्तसूर संगीत विद्यालय सातारा मृदुंग भेट देवून वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी विद्यालयाला गहू, तांदुळ, साखर इ. खाद्य वस्तु भेट देऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार मोहन जगताप व प्राध्यापक दिलीप धनवडे यांनी केले होते. .
या कार्यक्रमास अपंग विद्यार्थी, विद्यालयाचे कर्मचारी व संदीप कासुर्डे, नंदकुमार चिकणे, प्रशांत जुनघरे, चंद्रशेखर सावंत,भानुदास गायकवाड, प्रदीप देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.










