सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..

News By - Narayan Jadhav
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख
आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी ..
सातारा- जावली विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती डांबरी रस्त्याने जोडणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा आणि जावळी तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सातत्याने भरीव निधी उपलब्ध झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सातारा आणि जावली तालुक्यातील आणखी १० रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र. २ मधून तब्बल १६ कोटी ६२ लाख १६ हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
सातारा तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १० कोटी ९ लाख ७ हजार रुपये मंजूर झाले आहेत. टी.आर. ०२ ते गवंडी लांबी ३.२०० कि. मी. या रस्त्यासाठी २ कोटी ४६ लाख २६ हजार, वेचले ते शिवाजीनगर लांबी ३ कि.मी. या रस्त्यासाठी १ कोटी ९४ लाख १० हजार, परळी ते चिकणेवाडी लांबी १.७०० कि.मी. १ कोटी ४६ लाख ६१ हजार, टी.आर. ०८ ते जळकेवाडी लांबी २ कि.मी. १ कोटी ७६ लाख ६२ हजार, आसनगाव ते राकुसलेवाडी लांबी १.३०० कि.मी. १ कोटी ४ लाख ४८ हजार, टी.आर. ०२ ते दरे बु. लांबी १.५०० कि.मी. या रस्त्यासाठी १ कोटी ४१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
जावली तालुक्यातील महिगाव ते गणपती मळा लांबी १.९०० कि.मी. या रस्त्यासाठी १ कोटी ६१ लाख ८० हजार, टी.आर. ०२ ते जावळेवाडी लांबी १.६०० कि.मी. या रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख ७१ हजार, एम.डी.आर. १३९ ते बिरामणेवाडी लांबी १.७०० कि.मी. या रस्त्यासाठी १ कोटी ५९ लाख १५ हजार आणि सांगवी ते कुडाळ लांबी १.६०० कि.मी. या रस्त्यासाठी १ कोटी ९१ लाख ४३ हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे वेळेत सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.











