जावलीत ओला दुष्काळ जाहीर करा –
या मागणीसाठी राष्ट्रवादीचा भव्य शेतकरी मोर्चा…

News By - Sahyadri_News
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शासनाकडे करण्यात येणाऱ्या या मागणीसाठी “शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचे “आयोजन करण्यात आले आहे .
जावली तालुक्यात खरीप हंगाम पुर्णतः वाया गेला असून , सोमवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या मोर्चाचा आयोजन पंचायत समिती ते तहसील कार्यालय जावली असे करण्यात आले असून यावेळी जावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या व्यथांचे व ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा या मागणीचे निवेदन जावळीचे तहसीलदार यांना देण्यात येणार आहे .
या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव ,राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने पंचायत समिती जावली मेढा कार्यालयासमोर सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे .असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे










