Skip to content

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ओझरे शाळेस भेट…

IMG-20250402-WA0010.jpg

News By - Sahyadri_News

केळघर / नारायण जाधव .
*सह्याद्री न्युज स्टार ११*
  जावली तालुक्यात अव्वल असणारी,  राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात जिल्हास्तरीय ११ लाखांचे बक्षीस मिळवणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरे येथे आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन शालेय कामकाजाचा आढावा घेत थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी  विकास व्यवहारे, तहसिलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर
आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या भारावून टाकणाऱ्या आल्हाददायी व प्रसन्न वातावरणात झांज पथकाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत पंचायत समिती जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ व भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख मिलन मुळे यांनी केले. सरस्वती पूजनानंतर साहेबांनी वर्गात पाहणी केली असता इयत्ता १ ली, २री, व ४ थी च्या वर्गात मुलांशी व वर्गशिक्षिका सौ नेहा जाधव यांच्याशी संवाद साधला असता तीन वर्ग एकत्र शिकवताना मुलांची प्रगती व नियोजन कसे आहे याची चर्चा केली. इयत्ता दुसरीतील श्रेयांश मोरे याने जिल्हाधिकारी यांच्याशी समर्पक शब्दात संवाद साधला. त्याचे स्पर्धा परीक्षेतील यश व एक मिनिटात क्यूब सोडवण्याची क्षमता पाहून  भविष्यात श्रेयांशचे  भावी कलेक्टर होणार असल्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल  म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या. वर्गातील मुलांनी सलग पाचवी शिष्यवृत्ती, चौथी प्रज्ञाशोध, अभिरूप, मंथन या स्पर्धा परीक्षेत सलग  मिळवलेले यश पाहून मुलांचे व वर्गशिक्षिका नेहा जाधव  यांचे कौतुक केले. सलग चार वर्ष बालनाट्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक व इतर सर्वच स्पर्धातील यश पाहून गौरवोद्गार काढले त्यानंतर त्यांनी नव्याने तयार केलेले  सुसज्ज असे मुख्याध्यापक कार्यालय पाहिले. वाचन प्रेरणा उपक्रम, किलबिल बचत बँक, विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धातील यश तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत शाळेमध्ये शाळेने मिळवलेले ११ लाखांचे जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस तसेच  राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार या देशपातळीवर मिळवलेल्या सन्मानासाठी गटशिक्षणाधिकारी  संजय धुमाळ, विस्तार अधिकारी  चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख मिलन मुळे यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल पिसाळ, संगिता मस्के, नेहा जाधव, अमित आगोंडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन जंगम, उपाध्यक्षा दर्शनाताई कदम, माजी अध्यक्ष दत्ता लकडे  सर्व सदस्य, सरपंच अजित मर्ढेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सर्व मंडळे व सर्व पालक यांच्या योगदानातून निर्माण झालेला १८ लाखांच्या शैक्षणिक उठावातून शाळेच्या भौतिक व गुणवत्ता वाढीसाठीचे योगदान  पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो – ओझरे – जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे स्वागत करताना गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ सोबत मिलन मुळे व अन्य मान्यवर….

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..
Scroll To Top