Skip to content

विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .

WhatsApp Image 2024-09-15 at 12.38.57 PM

News By - Sahyadri_News

सह्याद्री न्युज स्टार ११
केळघर / नारायण जाधव .

विकास सेवा सोसायट्यांनी शेतकऱ्यांना केवळ कर्जपुरवठा न करता संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबववावेत. येथील केळघर विकास सेवा सोसायटी गेल्या ७४ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी काम करत असून सोसायटीने प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र सुरू केले असुन याचा फायदा सोसायटीच्या सभासदांना निश्चित होईल, यापुढील काळातही जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
केळघर विकास सेवा सोसायटीच्या वतींने सुर करण्यात आलेल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी व सोसायटीच्या ७४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना आमदार भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, सहायक निबंधक नानासाहेब रुपनवर,जिल्हा बँकेचे विकास आधिकारी राजेंद्र निकम, सोसायटीचे अध्यक्ष सुनील जांभळे,उपाध्यक्ष तुकाराम पार्टे, विक्री आधिकारी संजय निकम,अरुण खटावकर, संचालक रामभाऊ शेलार हरिभाऊ शेलार,एम. एस. पार्टे,जगन्नाथ शेलार,संपत सुर्वे,संजना शिंदे, पार्वती बेलोशे,दिलीप पाटील, शिवाजी चव्हाण,शशिकांत शेलार, लक्ष्मण जाधव,सचिव आनंदा शेलार, मोहनराव कासुर्डे, बबनराव बेलोशे, हनुमंत शिंगटे, राजेंद्र गाडवे, अंकुश बेलोशे,राजेंद्र शेलार आदींची उपस्थिती होती.


आमदार भोसले पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने विरोधक जावळीच्या जनतेशी जवळीक साधत आहेत. जावळीचा स्वाभिमान म्हणून काही जणांकडून जनतेचा बुद्धिभेद केला जात आहे. मात्र जावळीचा स्वाभिमान नक्की कुणी दुखावला याबाबत चे स्पष्टीकरण विरोधकांनी द्यावे. जावळी तालुका हा लोकसंख्येने छोटा असला तरी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर शाश्वत विकासकामे केली आहेत.स्व.भाऊसाहेबमहाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो शब्द देतो तो शंभर टक्के पूर्ण करतो याची जाणीव विरोधकांना देखील आहे. माझा माझ्या विकासकामांवर पूर्ण विश्वास असून विधानसभेला माझ्यासमोर कुणीही असू द्या मी निवडणुकीला उभा राहणार असून तालुक्यातील सर्वसामान्य जनता माझ्यासोबत असल्याने मला निवडणुकीची फिमिर नसून निवडणुकीपूरते पैशांचे राजकारण करणाऱ्या संधी साधूंना जावलीतील स्वाभिमानि जनता भीक घालणार नाही असा विश्वास आहे. जावळी तालुक्याला वरदान ठरलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न अंतिम असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला हक्काचे एक टीएमसी पाणी मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून त्यांना दिलासा देण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून करणार आहे. सातबाऱ्यावर असलेल्या देवस्थान जमिनीवरील शिक्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज व शैक्षणिक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी राज्य सरकारशी जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.लोकशाहीत सर्वसामान्य मतदारराजा माझ्या सोबत असून बॅनर वरील भावी आमदारांना जावळीतील स्वाभिमानी जनता या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. जिल्हा बँकेचे संचालक रांजणे म्हणाले, जन औषधी केंद्रमुळे सभासदांना अल्प दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ सभासदांनी घ्यावा.जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला २४तास उपलब्ध असणारे व विकासकामांच्या मुळे जावळीच्या जनतेशी आमदार भोसले यांची नाळ जोडलेली आहे.त्यामुळे अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी कायम उभे असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार जावळी तालुक्याने केला असून निवडणुकीपूरते जावळी तालुक्यात येणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मतदारांनी सज्ज राहावे,असे आवाहन केले.


जिल्हा उपनिबंधक सुद्रीक म्हणाले, केळघर सोसायटीने सुरू केलेले जन औषधी केंद्र हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले जन औषधी केंद्र असून विकास सोसायट्यांनि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ कर्जपुरवठा करणे ही विकास सेवा सोसायटीची जबाबदारी नसून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजेत.प्रारंभी आमदार भोसले यांच्या हस्ते जन औषधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मुदतीत कर्ज फेडणार्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रामभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक केले. सुनील जांभळे यांनी अहवाल वाचन केले. आनंदा शेलार यांनी आभार मानले. या वेळी शेतकरी, सभासद उपस्थित होते.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा येथे झालेल्या भिषण आपघातात वरोशी ता जावली येथील एका युवकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी .. वरोशी गावावर शोककळा..
आ .शिवेद्रसिंहराजे भोसले यांना मत्रीमंडाळात संधी मिळावी म्हणून बाबाराजे समर्थक केळघर विभागाच्या वतीने उत्तराखांड येथे केदारनाथ बाबांना साकडे .
आपली वर्तणूक चांगली असेल तर चांगलेच घडते प्रा . संध्या चौगुले .
केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा उद्योजक श्री सुनिल जांभळे (नाना ) यांची निवड झालेने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला यथोचित सत्कार ..
मेढा नगरपंचायतीच्या करवाढीच्या विरोधात आत्मदहन करावे लागेल .. सुरेश पार्टे .
वुडनिचर इंटेरिअर स्टुडिओच्या माध्यमातुन मेढ्यासह संपूर्ण जावली तालुक्यात सुबक व दर्जेदार कामाची खात्री .. आ. शिवेंद्रसिहराजे भोसले .
जावली तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध . आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले . 
श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघरचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश . .
मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्टस, जलपर्यटनाला मंजुरी . आ शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश राज्य शासनाकडून ४५ . ३८ कोटी रुपये मंजुर .
आसणी ता . जावली येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ..
Scroll To Top