Skip to content

आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही

IMG-20240822-WA0011

News By - Sahyadri_News

सहयाद्री न्युज स्टार ११

केळघर / नारायण जाधव .

आई ही कुटुंबाचा आधार व पाया असते. कुटुंबाला घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने आई करत असते. येथील जांभळे कुटुंबाने आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत या उपक्रमांतून जांभळे कुटूंबियांनि आपल्या आईच्या स्मृती चिरंतर ठेवल्या आहेत. जांभळे कुटूंबियांची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले .येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक व केळघर चे माजी सरपंच सुनील जांभळे यांच्या मातोश्री कै. पार्वती श्रीपती जांभळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार भोसले बोलत होते. यावेळी माजी सभापती बापूराव पार्टे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे ,प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष किरण यादव, माजी अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, सिद्धेश्वर पुस्तके,माजी सरपंच बबन बेलोशे, शंकर जांभळे, सुनील जांभळे यांच्यासह ग्रामस्थ ,शिक्षक उपस्थित होते.आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे,हे लक्ष्यात घेऊन जांभळे परिवाराने प्राथमिक शाळांना स्मार्ट टीव्ही आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेट म्हणून दिले आहेत. या स्मार्ट टिव्ही चा फायदा दुर्गम जावळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चित होईल. जावळी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता समृद्ध असून शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमांना लोकप्रतीनिधी म्हणून सहकार्य केले आहे. आमदार म्हणून काम करत असताना विशेषतः जावळी तालुक्यातील डोंगर-कपारीत वसलेल्या गावामध्ये विकासकामे पोचवून मी नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी कार्यरत आहे. या प्रसंगी ह.भ.प. अमोल महाराज जाधव यांची ‘आई ‘या विषयावरील कीर्तनसेवा उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणारी, अश्रूंना वाट करून देणारी झाली . त्यांनी आपल्या किर्तनामधून आईचे महत्व उलगडून सांगितले. आईच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात शंकर जांभळे यांनी ज्या शाळांमध्ये अध्यापनाचे काम केले त्या केळघर ,केडंबे,सावली , आंबेघर , रेंगडीवाडी या शाळांना स्मार्ट टि.व्हिचे वितरण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,बापूराव पार्टे तसेच ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते करण्यात आले . सुनिल जांभळे ( नाना ) यांनी आईच्या स्मरणार्थ प्राथमिक शाळा केळघर यांना स्वागत कमान बांधून देण्याचे जाहीर केले .यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत कमान बांधकामाचा शुमारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, नातेवाइक, ग्रामस्थ उपस्थित होते. शंकर जांभळे यांनी स्वागत केले. सुनील जांभळे यांनी आभार मानले.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..
Scroll To Top