Skip to content

वुडनिचर इंटेरिअर स्टुडिओच्या माध्यमातुन मेढ्यासह संपूर्ण जावली तालुक्यात सुबक व दर्जेदार कामाची खात्री .. आ. शिवेंद्रसिहराजे भोसले .

WhatsApp-Image-2024-03-07-at-5.20.36-PM

News By - Narayan Jadhav

सह्याद्री न्युज स्टार ११
मेढा /नारायण जाधव .
जावली तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा शहरात साळुंखे (सुतार) परिवाराच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या वुडनिचर इंटेरिअर स्टुडिओ कंपनिची भरभराट होऊन या कंपनीचा संपूर्ण सातारा जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होईल व एकाच जागेवर संपूर्ण फर्निचर इंटिरिअरसह संपूर्ण कामाचे डिझाईनसह वर्कशॉप मेढ्यात होत असल्याचा आनंद होत असुन अंकुशराव साळुंखे व परिवाराने लावलेल्या रोपट्याचे लवकरच वटवृक्षात रुपांतर होईल असे प्रतिपादन आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले .
मेढा ता .जावली येथे आज वुडनिचर इंटिरिअर स्टुडिओचे उदघाटन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते झाले .


यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे (साहेब ) मेढा नगरीचे मा . नगराध्यक्ष पांडुरंग जवळ,मा . उपसभापती कांतीभाई देशमुख , दत्ताआण्णा पवार , जेष्ठ नेते मोहनराव कासुर्डे , युवा उदयोजक सागर धनावडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी आ .शिवेद्रसिंहराजे भोसले म्हणाले अंकुशराव साळुंखे (सुतार ) अमित साळूंखे, अरुण साळुंखे , विजय सुतार, संजय सुतार, विनोद लोहार या परिवाराने भोगवली सारख्या ग्रामीण भागातुन आपला व्यवसायास सुरवात करून आज मेढ्या सारख्या तालुक्याच्या ठिकाणी एक कंपनी उभारून युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय कसा करावा याचा एक आदर्श निर्माण केला आहे .
या वुडनिचर इंटेरिअर स्टुडिओच्या उद्घाटन प्रसंगी व शुभेच्छा देण्यासाठी श्री विश्वकर्मा लोहार – सुतार सामाजिक विकास संस्था जावली अध्यक्ष , संचालक मंडळ व सर्व समाज बांधव , विर मराठा क्रिडा मंडळ भोगवली , गणेशवाडी मित्र मंडळ भोगवली , ग्रामस्थ भोगवली यांचे सह शशिकांत शेलार, शिवाजी गोरे , अंकुश बेलोशे , बाळासाहेब गाडवे , विष्णु धनावडे, हनमंत शिंगटे यांचेसह मित्र परिवार , नातेवाईक उपस्थित होते.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल
आंबेघर तर्फ मेढा येथे झालेल्या भिषण आपघातात वरोशी ता जावली येथील एका युवकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी .. वरोशी गावावर शोककळा..
आ .शिवेद्रसिंहराजे भोसले यांना मत्रीमंडाळात संधी मिळावी म्हणून बाबाराजे समर्थक केळघर विभागाच्या वतीने उत्तराखांड येथे केदारनाथ बाबांना साकडे .
आपली वर्तणूक चांगली असेल तर चांगलेच घडते प्रा . संध्या चौगुले .
केळघर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी युवा उद्योजक श्री सुनिल जांभळे (नाना ) यांची निवड झालेने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला यथोचित सत्कार ..
मेढा नगरपंचायतीच्या करवाढीच्या विरोधात आत्मदहन करावे लागेल .. सुरेश पार्टे .
जावली तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध . आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले . 
श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघरचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश . .
Scroll To Top