Skip to content

शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .

FB_IMG_1720607336541

News By - Narayan Jadhav

शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजूर
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; उभारणीचे काम लवकरच होणार सुरु ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव ..
केडंबे ता. जावली गावचे सुपुत्र वीर शहीद तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक उभारले जावे यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून राज्य सरकारने ग्रामविकास विभागामार्फत शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यामुळे केडंबे येथे लवकरच शहीद तुकाराम ओंबळे स्मारक उभारणीस प्रारंभ होणार आहे.
दरम्यान, निधी मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आले होते. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे या गावी त्यांचे भव्य स्मारक उभारले जावे अशी जनभावना होती. स्मारक उभारणीसाठी निधी मिळावा म्हणून शासन दरबारी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा अथक पाठपुरावा सुरु होता. अखेर आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी निधी मिळावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे निधी मिळवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे प्रयत्न करत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाचा आवर्जून उल्लेखही केला होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार राज्य सरकारने शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी रुपये निधी नुकताच मंजूर केला आहे. यामुळे शहीद तुकाराम ओंबळे स्मारक उभारणीतीला अडसर दूर झाला आहे. सुमारे १ हेक्टर क्षेत्रामध्ये हे भव्यदिव्य स्मारक उभे राहणार आहे. लवकरच प्रत्यक्ष स्मारक उभारणीचे काम सुरु होणार असून जावलीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, सर्व प्रकारचे शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून स्मारक उभारणीला त्वरित सुरुवात करण्याच्या सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top