Skip to content

ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .

IMG-20231206-WA0299

News By - Narayan Jadhav

ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे तात्काळ मदत मिळणार – डि.के.गोर्डे … ग्राम सुरक्षा यंत्रणा होणार कार्यान्वित… सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम

*सह्याद्री न्युज स्टार ११*
मेढा / नारायण जाधव .
ग्राम सुरक्षा यंत्रणा अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा असुन चोरी दरोड्याच्या घटने बरोबर इतर ग्रामसभा, वनवे, अपघात इत्यादी घटणांसाठी उपयोगी पडणारी यंत्रणा आहे. एका कॉलवर घडणाऱ्या घटणेबाबत तात्काळ सामान्य माणसापर्यत माहीती पोहचून तात्काळ मदत उपलब्ध करण्याच काम या सुरक्षे यंत्रणेमार्फत चालणार असल्याने या ग्राम सुरक्षा यंत्रणेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणाचे संचालक डि.के.गोर्डे यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत मेढा पोलीस स्टेशन मार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन मेळावा मेढा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमास मेढा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि संतोष तासगावकर, सपोनि अश्विनी पाटील, ग्राम सुरक्षा यंत्रणाचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, ग्राम सुरक्षा यंत्रणा संपर्क अधिकारी सतिश शिंदे ,गोपनीय अंमलदार अभिजीत वाघमळे, यांच्यासह मेढा पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. याप्रसंगी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन मा.श्री संतोष तासगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा पो.स्टे यांनी केले. उपस्थितांचे आभार पोलीस पाटील सुहास भोसले यांनी मानले.

चौकट –
ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.
* ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
*ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट*
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
*ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये*
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
*चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
शासकीय मराठी शाळे बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तहसिलदार जावली यांना निवेदन ..
Scroll To Top