Skip to content

मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद .. आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी ..

IMG-20231029-WA0000

News By - Narayan Jadhav

*मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद*
*आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी ..
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवात केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एक दिवस समाजासाठी या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शहर, उपनगर, तालुक्यातील हजारो ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येऊ लागली असून तसे फ्लेक्स झळकले आहेत. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्यावतीने बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी सातारा शहर, उपनगर व तालुक्यातील विविध गावांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजातील नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करत एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, आंदोलकांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. मराठा लोकांकडे मोठी शेतजमीन असल्याचे सांगून अनेकजण दिशाभूल करत आहेत, परंतु, पूर्वीच्या काळात दोनशे एकर असणारी जमीन आता दोन गुंठ्यावर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. होतकरू आणि गुणवंत मराठा मुलांना संधी मिळत नसल्याने कुचंबणा होत आहे. आता तरी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सातारा शहरातील ३ रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणासाठी २५ कोटी.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पाठपुरावा . नगरोत्थान योजनेतून मिळवला निधी ..
पोलिस व महसुल विभागाने समन्वयाने काम करावे .. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
Scroll To Top