” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..

News By - Narayan Jadhav
“एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न”…
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव . बोंडारवाडी धरणकृती समितीचे समन्वयक कै.विजयराव मोकाशी यांच्या स्मृतिदिनप्रीत्यर्थ मेढा ते केळघर या बारा किलोमीटर अंतरावरील मार्गावरून दौडचे आयोजन करण्यात आले होते. जावली करियर अकादमीच्या मुलानी व मुलांसह समितीच्या कार्यकर्त्यांनी यात समावेश घेतला होता.
मेढा येथील वेण्णा चौकात जावलीचे नायब तहसीलदार सुनील मुनाळे प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर वैद्यकिय अधिकारी डॉ. केदार कुलकर्णी आदिनाथ ओंबळे.डॉ सुप्रिया मुळे’ नारायण सुर्वे ,नारायण धनावडे, पत्रकार मोहन जगताप,विलास शिर्के, राजेंद्र जाधव , वैभव ओंबळे,यांनी झेंडा दाखवून दौंडचा शुभारंभ करण्यात आला.
मेढा ते केळघर मार्गावरील गावागावातील रस्त्यावर सुवासिनी व गावकर्यांनी दौडचे स्वागत केले. ठिकठिकाणचे युवक व युवती तरुण या दौडमध्ये गावोगावी सहभागी होत होते. केळघर ग्रामपंचायत हद्दीत बोंडारवाडी धरणकृती समितीच्यावतीने व विविध गावच्या सरपंच मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत केले जात होते. ही दौड यशस्वी करण्यासाठी बाजीराव धनावडे,बजरंग चौधरी, श्रीरंग बैलकर,उषा उंबरकर, जावली करीयर अकादमीचे संतोष कदम विष्णु डिगे, गेनूबुवा व संतोष बैलकर. सरपंच विजय सपकाळ. गणेश जगताप यांनी परिश्रम घेतले तर मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. सुप्रिया मुळे, आसमा शेख,संदीप बेलोशे व कर्मचारी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने करण्यात आले तर रामचंद्र मोरे यांनी आभार मानले. यावेळी बोंडारवाडी धरण कृती समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .










