Skip to content

जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..

IMG-20230731-WA0288

News By - Narayan Jadhav

जावळीत वृक्षतोडी वर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन.
* सह्याद्री न्युज स्टार ११*
मेढा /प्रतिनिधी (संजय वांगडे. )
जावळी तालुक्यात अवैध लाकुड तोड फोफावली असुन याच्यावर समाजातील सुज्ञ नागरिकांच्या सोबत वनविभागाने अधिकचे लक्ष केंद्रित केले पाहिजे नाहीतर जावळीत देखील ईर्शाळवाडी व माळीण सारख्या घटना भविष्यात घडतील..जावळी तालुक्यातील अनेक गावे डोंगर उतारावर वसलेली आहेत.. अतीप्रमाणात झाडे तोडल्यामुळे जमिन भुसभुशीत होऊन माती वाहुन भुस्खलन होते.. यामुळे जिवितहानी ,वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते.. यासाठी तालुक्यातील झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच कठोर नियम करावेत यासाठी पाणी फाऊंडेशन जावळी, नेहरू युवि मंडळ म्हाते खुर्द, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य, सह्याद्री प्रोटेक्टर्स जावळी यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधित जबाबदार अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.. गत उन्हाळ्यात जावळी तालुक्यात गावा गावात खैर,काटेसावर,सुबाभूळ,आंबा, जांभूळ इत्यादी झाडांची लाखोंच्या संख्येने कत्तल करण्यात आली यामुळे जमिनीची माती धारण क्षमता कमी होऊन तालुक्यात वरील गावांसारखी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न विचारण्यात आला आहे.. वनविभाग एक झाड तोडण्यासाठी परवानगी देत आहे आणि ईकडे हजारो झाडे तोडली जात आहेत.. यासाठी सदरच्या काळात झाडे तोडणारांवर तात्काळ कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत असेही निवेदनात म्हटले आहे..
यावेळी निवेदन सादर करतांना पाणी फाऊंडेशन जावळीचे अध्यक्ष मारुती चिकणे,सामाजिक कार्यकर्ते विकी दळवी, नेहरू यूवा मंडळ म्हाते खुर्द अध्यक्ष योगेश दळवी, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक शाम धनावडे,सह्याद्री प्रोटेक्टर्स जावळी दक्षिणचे अध्यक्ष श्रीकांत चिकणे,पाणी फाऊंडेशन उपाध्यक्ष प्रदीप धनावडे सचिव विश्वनाथ डिगे,यशवंत चिकणे, राजेंद्र वेंदे इत्यादी उपस्थित होते..

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सातारा जिल्ह्यातील मतदार शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहतील .. डॉ . सतिश बाबर …
सातारा शहरातील ३ रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणासाठी २५ कोटी.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पाठपुरावा . नगरोत्थान योजनेतून मिळवला निधी ..
पोलिस व महसुल विभागाने समन्वयाने काम करावे .. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
Scroll To Top