Skip to content

आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.

Screenshot_2024-07-15-19-16-26-74_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e71

News By - Sahyadri_News

*सह्याद्री न्युज स्टार ११*

केळघर /नारायण जाधव .

आंबेघर तर्फ मेढा (ता. जावली) येथे उभारलेल्या प्रतिपंढरपूर क्षेत्र विठ्ठलधाममध्ये या वर्षापासून आषाढी एकादशीला बुधवार दि.१७ रोजी वारी सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त या दिवशी येथे श्री विठ्ठलाची पहाटेची महापूजा, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम दणक्यात साजरे होणार आहेत.या सोहळ्याचा जिल्ह्यातील भक्तांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठलधामचे प्रमुख हभप प्रवीण महाराज शेलार यांनी केले आहे. जावली तालुक्यातील भक्तांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी, याकरिता आंबेघर येथे प्रतिपंढरपूर विठ्ठलधामची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा उदघाटन एप्रिल २०२३ ला झाला.तेव्हापासुन प्रत्येक महिन्याच्या एकादशीला हज़ारो भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवार दि.१७ रोजी विठ्ठलधाममध्ये पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल रुक्मिणीची महापूजा नामदार महेश शिंदे साहेब,श्री उमेशचंद्र दंडगव्हाळ-महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब-संचालक जिल्हा बैंक.यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन ईत्यादी कार्यक्रम होणार आहेत.जावलीतील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या काळात शेतातील कामांमुळे इच्छा असतानाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही. भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्या भागातच व्हावे म्हणून स्थापन केलेल्या विठ्ठलधाममध्ये वारी सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे..

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
Scroll To Top