मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …

News By - Narayan Jadhav
मेढा आठवडा बाजार बसला मेढा कुडाळ घाटात
मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
मेढा ( सोमनाथ साखरे ) मेढा येथिल आठवडा बाजार दर सोमवारी भरत असताना अचानक मराठा आरक्षणावरून सातारा जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आल्याने तरकारी व्यापार्यांनी आणलेला ओला माल वाया जावू नये यासाठी मेढा कुडाळ रस्त्यावरील घाटात मालदेव मंदिरा जवळ तरकारी बाजार भरविला.
आज मेढा येथिल आठवडा बाजाराचा दिवस होता. अनेक व्यापारी तरकारी घेवुन व्यापारी मेढा येथे दाखल झाले होते. परंतु स्थानिक व्यापार्याची दुकाने बंद असल्याने तरकारी व्यापार्यांनी आपला मोर्चा घाटाकडे वळवून तिथे भरविला.
मेढा हे तालुक्याचे मुख्यालय असल्यामुळे डोंगर माथ्यावरील जनता बाजारासाठी मेढ्यास येत असतात. किराणा सह तरकारी माल आठ दिवसाचा घरी नेत असताना बंद मुळे बाजार मिळणे अशक्य होते परंतु अचानक मालदेव येथे भाजी पाल्याची दुकाने सुरु असल्याचे समजताच अनेकांनी बाजाराचा लाभ घेतला.
फोटो – मेढा कुडाळ रस्त्यावर मालदेव मंदिरा जवळ व्यापार्यांनी आठवडा बाजार भरविला
( सोमनाथ साखरे )










