जावलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया .. आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .

News By - Narayan Jadhav
जावलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी मिळुन प्रयत्न करुया ..
आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिहराजे भोसले .
*सह्याद्री न्युज स्टार ११ *
मेढा / नारायण जाधव ..
शिष्यवृत्तीचा जावळी पॅटर्न तयार करून जिल्ह्यात गुणवत्तेचा ठसा उमठवणारी जावळीची उज्ज्वल शैक्षणिक पंरपरा यापुढे कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. जावळी शिक्षण विभागाच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी सभापती अरूणा शिर्के, कांतीभाई देशमुख, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष दत्ता पवार,
गटविकास अधिकारी मनोज भोसले, डाएट चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, साहित्यीक निलेश महिगावकर, दत्तात्रय पार्टे, विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंदकांत कर्णे, अरविंद दळवी, सरपंच सावली विजय सपकाळ, भास्कर धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, वर्षभर काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव वेळेवर होणे गरजेचे असते. त्यातून त्यांना काम आणि कार्यासाठी प्रेरणा मिळते.
तालुक्यातील शाळांच्या
भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने रोडमॅप तयार करू. कोयना भूकंप मधून अनेक शाळांना निधी दिला आहे.
जावळीच नाव जिल्ह्यात नावाजल गेलं पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया.
गुणवत्ता वाढविण्यासाठी व जावळीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हवं ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी नेहमी सोबत आहे असे शेवटी त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात आजची शिक्षण व्यवस्था यावर निलेश महिगावकर यांचे व्याख्यानाने झाली. प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी जावळीच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडून जावलीची उज्ज्वल शैक्षणिक पंरपरा यापुढे कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनीही शिक्षकांचे कौतुक केले .
कार्यक्रमात तालुक्यातील ४१ शिक्षकांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा ओझरे, जिल्हा स्तरावर उत्कृष्ट परसबाग आदर्श शाळा म्हणून महू शाळा, स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील शाळा म्हणून सर्जापूर शाळा या तीन शाळांचा गौरव करण्यात आला.
आदर्श शिक्षकांमधून संदिप किर्वे व मनिषा शेलार यांनी मनोगत व्यक्त केले . आदर्श शिक्षक अशोक लकडे गुरुजी व योगिता मापारी यांनी केले .अरविंद दळवी यांनी आभार मानले.
चौकट : गटविकास अधिकारी मनोज भोसले व गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी वेळेत शिक्षक पुरस्कार सोहळा घेतल्याबदल व मागील राहीलेलेही पुरस्कार वाटप केल्या बदल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कोतुक केले .










