Skip to content

आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..

Screenshot_2024-07-15-19-16-26-74_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e71

News By - Narayan Jadhav

*आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम*
*दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.*
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
आंबेघर तर्फ मेढा (ता. जावली) येथे उभारलेल्या प्रतिपंढरपूर क्षेत्र विठ्ठलधाममध्ये या वर्षापासून आषाढी एकादशीला बुधवार दि.१७ रोजी वारी सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त या दिवशी येथे श्री विठ्ठलाची पहाटेची महापूजा, भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम दणक्यात साजरे होणार आहेत.
या सोहळ्याचा जिल्ह्यातील भक्तांनी आनंद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठलधामचे प्रमुख हभप प्रवीण महाराज शेलार यांनी केले आहे. जावली तालुक्यातील भक्तांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाची सोय आपल्या भागातच उपलब्ध व्हावी, याकरिता आंबेघर येथे प्रतिपंढरपूर विठ्ठलधामची उभारणी करण्यात आली आहे. त्याचा उदघाटन एप्रिल २०२३ ला झाला.तेव्हापासुन प्रत्येक महिन्याच्या एकादशीला हज़ारो भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने बुधवार दि.१७ रोजी विठ्ठलधाममध्ये पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल रुक्मिणीची महापूजा नामदार महेश शिंदे साहेब,श्री उमेशचंद्र दंडगव्हाळ-महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र,श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब-संचालक जिल्हा बैंक.यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन ईत्यादी कार्यक्रम होणार आहेत.

जावलीतील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या काळात शेतातील कामांमुळे इच्छा असतानाही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येत नाही. भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्या भागातच व्हावे म्हणून स्थापन केलेल्या विठ्ठलधाममध्ये वारी सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे..

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त राहणे आवश्यक .. सुनिल मुनाळे .
” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..
केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकार्ऱ्यांवर कारवाई करा ..अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा . राष्ट्रवादी युवक काँग्रेसे युवा नेते .. संकेत पाटील . .
राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा .. अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..
बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .
तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार .. सुनिल कदम ..
जावलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया .. आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .
साताऱ्यात लवकरच पत्रकारासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा . एस .एम . देशमुख .. अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद साताऱ्याला हे परिषदेसाठीही भूषणावह …
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
Scroll To Top