राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा .. अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..

News By - Narayan Jadhav
राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा ..
अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..
*सहयाद्री न्युज स्टार ११*
*केळघर ( नारायण जाधव )*
सोलापुर जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांना धनगर आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन देनाना शेखर बांगळे यांनी राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यावर भंडारा उधळला म्हणून शेखर बांगळे यांना मंत्र्यांच्या बॉडीगार्ड व कार्यकर्त्याकडून अमानुष मारहान करण्यात आली .
याप्रकरणी मारहान करणाऱ्या संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी जावलीचे तहसिलदार हनमंत कोळेकर यांना अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावली यांचेवतीने निवेदन देण्यात आले .
यावेळी अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्थेचे जावली तालुका अध्यक्ष श्री करण आखाडे, उपअध्यक्ष समीर झोरे , कार्याध्यक्ष अनिल ढेबे, सचिव सुरेश कोकरे , खजिनदार जगन्नाथ शिंदे व सदस्य उपस्थित होते .
राज्यातील धनगर समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबीत असुन सरकारने हा प्रश्न झुलवत ठेवला असुन ही मागणी पुन्हा जोर धरु लागला आहे . काही ठिकाणी आंदोलन उपोषनांना प्रारंभ झाला आहे .
मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटलांच्या समोरच मारहाण करणाऱ्या संबंधीतांवर गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन तहसिलदार हनमंत कोळेकर यांना अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावली यांच्यावतीने अध्यक्ष करण आखाडे व सर्व कार्यकारणीच्या वतीने देण्यात आले .
फोटो : जावलीचे तहसिलदार हनमंत कोळेकर यांना निवेदन देताना करण आखाडे, समीर झोरे, भगवान आखाडे, अनिल ढेबे, सुरेश कोकरे, जगन्नाथ शिंदे आदी .










