Skip to content

इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..

IMG-20230924-WA0336

News By - Narayan Jadhav

*इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठाराला भेट*
*सह्याद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी .
विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. श्रीमती मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास तसेच साताऱ्यातील डॉ. अजित कुलकर्णी यांच्या होमिओपेथिक क्लिनिकला नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांच्या सहाय्यक गिली मोअर याही होत्या.
डॉ. श्रीमती याकीर या डॉ. अजित कुलकर्णी यांच्या दृढ स्नेही असून त्या वरचेवर डॉ. कुलकर्णी यांच्या सातारा आणि पुण्यातील क्लिनिकला भेट देत असतात. या भेटीतून डॉ. कुलकर्णी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण केसेस त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. डॉ. कुलकर्णी यांनी साताऱ्यातील राधिका पैलेस येथे नुकतेच एक होमियोपैथीवरील विचारमंथन शिबीर आयोजित केले होते. त्यात डॉ. याकीर यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानातून अत्यंत उद्बोधक असे मार्गदर्शन उपस्थित डॉक्टरांना केले. या व्याख्यानात डॉ. याकीर यांनी पंचमहाभूते, वनस्पती विकासाचे टप्पे आणि प्रकिया तसेच या दोहोंचा होमियोपैथी चिकित्साशास्त्राशी असलेला अन्योन्य संबंध याबद्दल मौलिक विवेचन केले. याच शिबिरात डॉ. याकीर यांच्या हस्ते डॉ. अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ” Harmony In Totality – Vol – २ ” या १००० हुन अधिक पृष्ठाच्या होमियोपैथीवरील नवीन अभ्यासपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन झाले.

साताऱ्यातील वास्तव्यात श्रीमती याकीर आणि श्रीमती मोअर यांनी जगप्रसिद्ध अशा कास पठार आणि ठोसेघर धबधब्यासोबत कुमुदिनी सरोवरासही भेट दिली. येथील विविधरंगी पुष्पांचे सौन्दर्य, प्रसन्न, शुद्ध तसेच आल्हाददायक वातावरण अनुभवून त्या दोघीही अत्यंत प्रभावित झाल्या. कास पठारावरील निसर्गाच्या सान्निध्यामुळे आपणास अत्युच्च कोटीचे आणि आश्चर्यकारक असे भावनिक समाधान मिळाल्याचेत्यांनी आवर्जून सांगितले. या परिसरास केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर मानसिक समाधानासाठी सुद्धा वारंवार भेट देण्याचा मोह होतो असेही त्यांनी सांगितले. या निसर्ग सहवासात डॉ. याकीर यांना फॉरेस्ट ऑफिसर श्री. माने साहेब आणि मार्गदर्शक श्री. श्रीरंग शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी कास पठार समितीने डॉ. याकीर यांना कास पठाराचे चित्र देऊन उचित सन्मान केला. या सर्व उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. निखिल कुलकर्णी, डॉ. प्रसाद रायरीकर, डॉ. सुजित स्वामी तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. डॉ. याकीर यांची ही सदिच्छा भेट म्हणजे होमियोपैथी आणि निसर्गशक्ती यामधील अतूट बंधाचा समृद्ध अनुभव होता असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top