Skip to content

बोंडारवाडी ग्रामस्थांची धरणाच्या सर्वेला मान्यता .. सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे मध्यस्थीला यश ..

IMG-20231123-WA0053

News By - Narayan Jadhav

बोंडारवाडी ग्रामस्थांची धरणाच्या सर्वेला मान्यता ..
सातारा जावलीचे लोकप्रिय आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे मध्यस्तीला यश ..

   सहयाद्री न्युज स्टार ११

केळघर / नारायण जाधव .

  केळघर विभागातील 54 गावाच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा याकरता आदरणीय महाराज साहेब यांच्या प्रयत्नातून 1 टीएमसी धरणाला मान्यता मिळाली असून सदर बोंडारवाडी धरणाचे सर्वे करण्यासाठी 80 लाख रुपये मंजूर असून सर्वेची टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून वर्कऑर्डर झालेली आहे.


मात्र विविध मागण्यासाठी सर्व्हे करण्यास बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता या वर तोडगा काढण्यासाठी आ शिवेद्रसिह राजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शना खाली बोंडारवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ ,जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब,जावळीचे प्रांत अधिकारी तहसीलदार साहेब जलसंपदा विभाग तसेच पुनर्वसन व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न झाली यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचे शब्दावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास मान्यता दिली .


यावेळी कमीत कमी जमीन बाधित होईल आणि 1tmc चे धरण होईल असा सर्व्हे करणेचे सूचना अधिकारी यांना केलेत. महाराज साहेब यांनी शेवट पर्यंत बोंडारवाडी ग्रामस्थ यांचे सोबत असून सर्व्हे झालेनंतर योग्य ती जागा ठरवून ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही याची पुर्णपने काळजी घेतली जाईल प्रसंगी निधी वाढवून घेतला जाईल. असे ग्रामस्थ यांना अश्वासीत केले . तेव्हा ग्रामस्थानी सर्व्हे कराण्यास मान्यता दिली. तेव्हा आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब व ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी बोंडारवाडी ग्रामस्थांचे आभार मानले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
Scroll To Top