Skip to content

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे साताऱ्यात जोरदार स्वागत … सातारकरांशी साधला संवाद ..

IMG-20231004-WA0359

News By - Narayan Jadhav

*भाजप प्रदेशाध्यक्ष चेंद्रशेखर बावनकुळेंचे जोरदार स्वागत*
*सातारकरांशी साधला संवाद*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी .
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी जिल्हा दौर्‍यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सातार्‍यात दणक्यात स्वागत करण्यात आले. मोती चौक ते घोडके सराफ ज्वेलर्सपर्यंत पदयात्रा काढून त्यांनी सर्वसामान्य सातारकरांसह व्यापार्‍यांशी संवाद साधला. संवादानंतर झालेल्या सांगता सभेत नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधार करण्याचे आवाहन करत विरोधकांवर टीका केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदनदादा भोसले, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोती चौकात भला मोठा हार घालून फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी खास माणदेशी गजी, लेझीम पथक, ढोल पथक बोलावण्यात आली होती. सुमारे ३००मीटरची पदयात्रा करत त्यांनी व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. २० २४ साली तुम्हाला कोण पंतप्रधान हवा, तसेच कोण मुख्यमंत्री हवा असे प्रश्‍न विचारत कल जाणून घेतला. दरम्यान, या दौर्‍यात खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय होती.
काँग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचे राजकारण
सभेत बोलताना ते म्हणाले. आम्ही सातार्‍यात लेखाजोखा मांडू तेव्हा महायुतीचाच लोकसभेला उमेदवार निवडून येईल. आम्हाला आत्मविश्‍वास आहे. काँग्रेस पक्षात ब्लड कॅन्सर आहे. काँग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण आहे. काँग्रेसचं ६५ वर्ष सरकार हे कन्फ्यूज करण्याच चाललं कन्व्हेन्स करण्याच नाही. काँग्रेस डेव्हलपमेंटच काही सांगणार नाही. भाजप मोदींनी, देवेंद्रनी आणि शिवेंद्रराजेंनी केलेली काम सांगणार आहे. आम्ही आमची काम सांगून मत घेणार आहे. आम्ही जो व्यक्ती कन्फ्यूज झालेल आहे त्याला कन्व्हेन्स करण्यासाठी निघालो असल्याचेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत मायावी लोक आहेत. मी उध्दव ठाकरे यांनी जी काही २८पक्षाची इंडिया आघाडी केली आहे. त्यामधील त्याचा घटक पक्ष हिंदू संस्कृती संपू म्हणाला आहे. तेव्हा त्यांना मान्य आहे का ते त्यांनी जनतेत सांगावी. जनता यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

पोलिस व महसुल विभागाने समन्वयाने काम करावे .. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
Scroll To Top