Skip to content

शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..

IMG-20230904-WA0254

News By - Narayan Jadhav

शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील…..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
सातारा /मोहन जगताप .. सांगली जिल्ह्यातून पुण्यासारख्या शहरात आपल्या नोकरीच्या निमित्ताने राज्यातील शिक्षकेतर संघटना मजबूत करून कायमच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींचा प्रश्न शासन स्तरावर मांडून शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय देण्याचे काम केल्याने खा. शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात पारदर्शकतेचा आदर्श असलेल्या शिवाजी खांडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याने त्यांच्या नियुक्ती बदल सातारा जिल्ह्यातील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व राज्यातील पाश्चिम महाराष्ट्र रायगड, रत्नागिरी येथील राज्य शिक्षकेतर संघटनेच्यावतीने विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांनी युवकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याच्या दृष्टीने राज्यातील राजकिय घडामोडींचा विचार करता राज्यातील विविध समाजाभिमुख कार्य करणाऱ्या लोकांना संधी देवून त्यांच्या विचारांना चालना देवून त्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या विकासात्मक कार्यास झोकून देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची गरजच असल्याचे व नव्या पिढीला यशवंत विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन मोहन जगताप यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते पत्रकार अनिल राणे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून खांडेकरसरांच्या माध्यामातून अनेक शालेय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम युद्धपातळीवर केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेवून राज्य शालेय शिक्षकेतर संघटनेचा सन्मानच झाला असून त्यांच्या विचारांची परंपरा राज्यातील मित्रमंडळी कायमच सोबत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना संबोधित करताना खांडेकर म्हणाले की राज्यभरात शिक्षकेतर संघटनेचे काम करतांना विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नांची जाण मला होतीच मर्यादा सोडून कोणताही विषयात लक्ष घालून संघटनेत दुर्लक्ष करायचे नव्हते पण राज्यातील राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या पदामुळे संघटनेसह राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असून ती निश्चित सोडविण्याचे प्रयत्न करू. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळगस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगून राज्य सरकारने लवकरात लवकर राज्यात दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल माने यांनी स्वागत केले तर लोकहित न्यूज चॅनेलचे संपादक चंद्रकात देवरुखकर यांनी आभार मानले कार्यक्रमास पुणे विभागीय शिक्षणेतर पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

पोलिस व महसुल विभागाने समन्वयाने काम करावे .. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
जेष्ठ पत्रकार प्रा . तुकाराम ओंबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
समाजसेवक, उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ)” सह्याद्री न्युज स्टार ११ ” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत . .
समाजसेवक , उद्योजक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) यांची ” सहयाद्री न्युज स्टार ११” ला सदिच्छा भेट .. नारायण जाधव यांनी केले स्वागत ..
*टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताऱ्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान * राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव …
टपाल विभागाच्या पोस्ट कार्डावर साताच्यातील ” बाजीराव ” च्या विहिरीला स्थान .. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त केंद्र शासनाकडुन गौरव ..
पंचक्रोशी विद्यालय मालचौंडीच्या कबड्डी संघाची तालुकास्तरावर चमकदार कामगिरी ..
सातारा- जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मिळवला निधी ..
सातारा – जावलीतील १० रस्त्यांसाठी १६ कोटी ६२ लाख .. आ शिवेंद्रसिहराजे भोसले : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळवला निधी ..
Scroll To Top