Skip to content

मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..

IMG-20230807-WA01991

News By - Narayan Jadhav

मैत्रीदिनी “एक झाड मैत्रीचं” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण…
मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम..
* सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा सर्वत्र मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. याच मैत्रीदिनाचे औचित्य साधून “एक झाड मैत्रीचं” हा संदेश देत डांगरेघर ता. जावली येथे मित्रमेळा फाउंडेशन जावली व ग्रामपंचायत डांगरेघर यांच्यामाध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या रस्त्याच्या दुतर्फा तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवारी सर्वत्र मैत्रीदिन उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी जुने मित्र एकमेकांना भेटतात, मैत्रीच्या आठवणी ताज्या करत आयुष्याच्या शेवटपर्यंत मैत्री न तोडण्याची वचने एकमेकांना देत विविध पद्धतीने मैत्रीदिन साजरा करतात. मात्र मैत्रिदिनाच्या या जुन्या संकल्पनांना फाटा देत जावली तालुक्यातील मित्रमेळा फाउंडेशन व ग्रामपंचायत डांगरेघर यांनी यावर्षीचा मैत्रीदिन हा निसर्गासोबत साजरा केला आहे. मैत्रीदिनाचे औचित्य साधत मित्रमेळा फाउंडेशन व ग्रामपंचायत डांगरेघर यांनी एक झाड मैत्रीचं या संकल्पनेखाली डांगरेघर गावातून धावली गावाला जाणाऱ्या रस्त्याला तसेच गावच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण केले आहे. यावेळी पिंपळ, जांभूळ, करंज, बेल, शेवगा, कवट, आवळा इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच यावेळी गावात असणाऱ्या प्राथमिक शाळेतील मुलांना सुद्धा झाडे भेट देण्यात आली. यावेळी या वृक्षारोपन कार्यक्रमासाठी मित्रमेळा फाउंडेशन तसेच डांगरेघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:
सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून निसर्गाची खूप हानी होत आहे. जे विकासक झाडे तोडतात ते झाडे लावताना मात्र दिसत नाहीत. तसेच वणव्यामुळे सुद्धा हजारो झाडे नष्ट होतात. त्यामुळे वृक्षारोपण हि काळाची गरज असून पुढच्या पुढच्या पिढयांचे स्वास्थ बळकट करायचे असेल तर निसर्गसंवर्धन खूप महत्वाचे आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक झाड मैत्रीचं म्हणत रविवारी शेकडो झाडे लावली गेली. तशीच समाजातील प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करत वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे.
प्रवीण पवार
अध्यक्ष मित्रमेळा फाउंडेशन

फोटो: डांगरेघर : वृक्षारोपण करताना मित्रमेळा फाउंडेशनचे सदस्य व डांगरेघर ग्रामस्थ ( छाया नारायण जाधव )

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त राहणे आवश्यक .. सुनिल मुनाळे .
” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..
केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकार्ऱ्यांवर कारवाई करा ..अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा . राष्ट्रवादी युवक काँग्रेसे युवा नेते .. संकेत पाटील . .
राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा .. अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..
बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .
तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार .. सुनिल कदम ..
जावलीची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया .. आमदार श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .
साताऱ्यात लवकरच पत्रकारासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा . एस .एम . देशमुख .. अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद साताऱ्याला हे परिषदेसाठीही भूषणावह …
मराठा आरक्षणासाठी मेढ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
Scroll To Top