Skip to content

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सदैव सभासद , खातेदारांच्या पाठीशी .. श्री ज्ञानदेव रांजणे .

IMG-20260628-WA0011.jpg

News By - Sahyadri_News

*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्याबरोबच त्यांच्या उन्नतीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा  योजनेची अंमलबजावणी केली जात असून खातेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे यांनी केले .
  वाटंबे ता .जावली येथील शेतकरी कै . धोंडीबा गणपत भणगे हे केळघर येथील जिल्हा बँकेचे खातेदार यांचे काही दिवसापुर्वी आकस्मित निधन झाले होते .
  त्यांच्या विम्याचा दोन लाखाचा धनादेश त्यांच्या आई जनाबाई गणपत भणगे यांचेकडे सपुर्त करण्यात आला . जिल्हा बँकेच्या वतीने पुढाकार घेऊन त्यांचा वार्षीक प्रिमियम भरल्याने त्यांच्या वारसांना त्याचा फायदा झाला आहे .
   यावेळी केळघर शाखा व्यवस्थापक सुर्यकांत चिकणे, वरोशी सोसायटीचे चेअरमन श्री मोहनराव कासुर्डे, केळघर वि .से . सोसायटीचे संचालक श्री नारायण जाधव , जगन्नाथ शेलार यांचेस केळघर सोसायटीचे सचिव आनंदा शेलार, वरोशी सोसायटीचे सचिव दिपक शेलार , विश्वास बेलोशे , प्रदिप कासुर्डे ‘ अक्षय पवार, संतोष शिर्के, तेजस कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती .
  यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे म्हणाले जिल्हा बँक सदैव शेतकर्यांच्या ‘ खातेदारांच्या सदैव पाठीशी असुन जिल्हा बँक योजना राबत असुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..
जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..
जावली तालुक्यातील धोकादायक दरड प्रवणक्षेत्र गावांची प्रशासनाच्या वतीने पाहणी ..
Scroll To Top