Skip to content

जावली तालुक्यातील धोकादायक दरड प्रवणक्षेत्र गावांची प्रशासनाच्या वतीने पाहणी ..

IMG-20230720-WA0407

News By - Narayan Jadhav

मेढा / स्वप्निल जाधव .
जावली तालुक्यात अतिवृष्टीमुळे धोकादायक झालेल्या बोंडारवाडी, भुतेघर व बाहुळे गावांच्या दरडी कडे व डोंगरात गावच्या वरच्या बाजुस धोकादायक महाकाय असलेला दगड स्वतः जावलीचे प्रांताधिकारी दादासाहेब दराडे, तसेच नुतन तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांनी थेट ओढ्या नाल्यातून अडचणीतून गवतातून वाट काढत थेट डोंगरा वर जाऊन प्रत्यक्ष दगडाची व दरडींची पाहणी केली . तातडीने बोंडारवाडीतील चार ते पाच कुटुंब आणि भुतेघर येथील तीन ते चार कुटुंबाचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले . मात्र या गावांना अति पावसाचा धोका या दरड व दगडामुळे होवू शकतो हे तितकेच स्पष्ट आहे . सायंकाळपर्यंत या अधिकार्यांचे येथे कामकाज सुरु होते .
येवढ्या अडचणीतून वारे पाऊस असताना तसेच रेड अलर्ट जाहीर झालेला असतानाही प्रांत दादासाहेब दराडे व तहसिलदार हणमंतराव कोळेकर, सर्कल उमेश डोईफोडे त्यांची टीम यांचे अनेकांनी कौतुक केले आहे .
जावळीच्या पश्चिमेस असेल्या जावळीचे शेवटचे टोक म्हणजे बोंडारवाडी , भुतेघर व बाहुळे या
गावांना अतिवृष्टीमध्ये पुरासह डोंगर दऱ्यांचा धोका असतोच , यावर्षीही असाच धोका निर्माण झाला असून बोंडारवाडी व भुतेघर गावांना अतिवृष्टीचा धोका होवू नये म्हणून जागेवर परीस्थिती आणि ठोस उपाय योजना प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहेत . मात्र या बोंडारवाडी व भुतेघर गावांचे एकतर चांगले पुर्नवर्सन तरी अथवा आहे तेथे त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे . तरच उद्या होणारी दुर्घटना टळू शकते . तरच माळीन आणि इशाळवाडी सारखी परिस्थिती होणार नाही .
आपला जीव धोक्यात घालून कधीही ओढ्याला पूर येवू शकतो मात्र जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावून सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच आम्ही आहोत असे आपल्या कृतीतून महसुल अधिकारी प्रांत दादासाहेब दराडे व तहसिलदार हणमंतराव कोळेकर यांनी दाखवून दिले . त्यांच्याबरोबर सर्कल उमेश डोईफोडे, तलाठी एस डी ढाकणे, सुरज माळी , रविकांत सपकाळ, सुधीर पोतदार व ग्रामस्थ होते .
कोट : दादासाहेब दराडे : प्रांत जावली
बोंडारवाडी आणि भुतेघर या गावांना सध्या धोका नसला तरी जोराची अतिवृष्टी झाली तर धोका नाकारू शकत नाही . त्यामुळे भविष्यात चार पाच कुटुबांचे पुर्नवसन अथवा स्थलांतर करून चालणार नाही तर या गावांचे पुनवर्सन करणे गरजेचं आहे .
भुतेघर : ओढ्यातून जाताना दादासाहेब दराडे, हणमंतराव कोळेवर व इतर ( छाया : नारायण जाधव )
भुतेघर : येथील हाच तो मोठा भितीदायक दगड ( छाया : नारायण जाधव .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आंबेघर तर्फ मेढा गणातुन नारायण जाधव (भाऊ) यांना उमेदवारी मिळावी . .
सातारा जिल्हयातील भाजपाच्या ७ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यथोचीत सन्मान ..

श्री. एकनाथदादा ओंबळे –
जावलीच्या मातीतील खरा हिरा, लोकांच्या मनातील खरा नेता!
केळघर आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा ठिय्या , सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू . वैद्यकिय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ..
बोंडारवाडी धरण पूर्ण करणे हीच  कै . विजयराव मोकाशी यांना खरी श्रद्धांजली .. ना .शिवेंद्रसिंहराजे भोसले .
कै .पांडुरंग महादेव पार्टे (भाऊ ) यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी (श प ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे व मा . प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाहिली आदरांजली .
स्मार्ट ग्राम सावलीत हरितक्रांतीची चळवळ .. डोंगरात १५०० देशी झाडांची लागवड .
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या सत्कारासाठी मेढा नगरी सज्ज –
आ. रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती .
केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .
तापोळा ते महाबळेश्वर प्रमुख मार्ग हलक्या वाहनांसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु .
Scroll To Top