Skip to content

केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .

IMG-20250725-WA0016.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
  केळघर / नारायण जाधव  .
   केळघर हे बाजारपेठेचे गाव असुन  येथील व्यावसायिकांना दैनंदिन वापरत असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे .


या अनुशंघाने केळघर ता . जावली येथील बाजारपेठेतील सर्व व्यवसायीकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्यक्ष नोटीस बजावुन सर्व प्रकारच्या प्लास्टीक  पिशव्या , थर्माकोल व प्लास्टिक पासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु ( ताट, कप्स ,ग्लास, वाटी , चमचे ) , हॉटेलमध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडी व वाटी , द्रव पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टीक पाऊच कप . , ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीची प्लास्टिक पिशवी . याप्रमाणे बंदी असलेले प्लास्टीक पिशव्या उत्पादन व वापरणाऱ्यास ५००० / रु दंड दुसर्यांदा १०, ००० / रु दंड आणि तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५000/- रु दंड आणि तीन महिन्यापर्यंत शिक्षेची तरदुत असल्याचे नोटीशित नमुद केले आहे .
यावेळी उपसरपंच शंकर गणपत बेलोशे , मा सरपंच सागर भगवान पार्टे , ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गणपत बेलोशे ‘ सदस्या रेखा आनंदा चव्हाण , सौ हिराबाई आनंदा भिलारे, ग्रामपंचायत अधिकारी श्री . शुक्राचार्य विष्णु साळुंखे यांचे सह शैलेश पार्टे , दिपक शिंदे अरुण खोडे , सौ सुकेशिनी बिरामणे , सुजाता गाडवे , लिलावती सल्लक , जयश्री बेलोशे यांचे सह ग्रामस्त उपस्तित होते .

फोटोः प्लास्टिक बंदिबाबत केळघर येथील व्यवसायीकांना नोटीस बजावताना उपसरपंच शंकर बेलोशे, सागर पार्टे ग्रामपंचायत अधिकारी शुक्राचार्य साळुंखे आदी . (छाया : नारायण जाधव )


महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्लासिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमादवारे गांवातील सर्व व्यवसायीकांनी प्लास्टीक पिशवा ऐवजी कापडी व कागदी पिशव्याचा वापर करावा आणि प्लास्टीकचा वापर टाळावा व गांव प्लास्टीकमुक्त करण्यास हातभार लावावा . प्लास्टीक पिशव्या , उत्पादने यांचा वापर करताना आढळून आल्यास आपणा विरुद्ध ग्रामपंचायती मार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल .
  श्री .शुक्राचार्य विष्णु साळुंखे .
  ग्रामपंचायत अधिकारी केळघर तर्फ मेढा .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

सभासद – शेतकयांच्या सहकार्यामुळेच ‘ अजिंक्यतारा ‘ ची घोडदौड आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .. कारखान्याची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात सपन्न …
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ..
इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..
गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबर शरीर तंदुरुस्त राहणे आवश्यक .. सुनिल मुनाळे .
” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..
केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकार्ऱ्यांवर कारवाई करा ..अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा . राष्ट्रवादी युवक काँग्रेसे युवा नेते .. संकेत पाटील . .
राधाकृष्ण विखे – पाटलांच्या अंगरक्षकांवर गुन्हे दाखल करा .. अहिल्यादेवी होळकर युवा सामाजिक संस्था जावलीच्या वतीने तहसिलदार जावली हनमंत कोळेकर यांना निवेदन ..
बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .
तंटामुक्ती मधील प्रकरणे सामंजस्याने सोडवणार .. सुनिल कदम ..
Scroll To Top