Skip to content

बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक

IMG-20250604-WA0019.jpg

News By - Sahyadri_News


केळघर /नारायण जाधव .
बारा बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण असल्याने उपमहामंडळांच्या लाभापासून गावगाड्यातील बारा बुलतेदार समाज वंचित आहे.त्यांच्याकडे सरकारने वेळेत लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा आंदोलनच करावे लागेल, असे प्रतिपादन बाराबलुतेदार संघाचे राज्याध्यक्ष व नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.
मेढा येथे झालेल्या नाभिक महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी
  एकलव्य संघटनेचे अध्यक्ष व म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे
शेतकरी संघटनेचे नेते व महाज्योतीचे माजी संचालक लक्ष्मणराव वडले नाभिक महामंडळाचे नेते विजय सपकाळ, तालुकाध्यक्ष रविंद्र पवार, माजी अध्यक्ष राजेंद्र निकम , शहरप्रमुख सुर्यकांत निकम , गणेश सपकाळ आदी उपस्थित होते .
कल्याणराव दळे म्हणाले, निवडणुकीपूर्वी सरकारने ओबीसी महामंडळातर्गत 18 उपमंडळांची घोषणा केली. परंतु, व्यावसायिक लाभार्थ्यांना जाचक अटी व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाभ मिळत नसल्यामुळे बारा बलुतेदार व्यवसाय मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये आला आहे. अजितदादा पवार यांनी हुतात्मा भाई कोतवाल, जिवाजी महाले यांच्या स्मारकांसाठी निधीची घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. अशा सरकारच्या उदासीन धोरणा विषयी आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या आव्हान दळे यांनी केले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या महाज्योती संस्था ५४ टक्के लोकसंख्या असलेल्या समूहातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने शब्द देऊन सुद्धा जाणीवपूर्वक पुरेशा सोयी, सुविधा न दिल्यामुळे मोठ्या संकटांना विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशावेळी केंद्र शासनाने निर्माण केलेल्या न्या. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.
यावेळी नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते होते. प्रारंभी हभप अतुलमहाराज देशमुख यांनी स्वागत केले. महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय सपकाळ यांनी प्रास्ताविक केले .
अध्यक्ष रविंद्र पवार यांनी आभार मानले.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..
जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..
Scroll To Top