Skip to content

बावधन बगाड मानकरी-अजित बळवंत ननावरे

IMG-20250314-WA0080.jpg

News By - Sahyadri_News

**सहयाद्री न्युज स्टार ११* केळघर / नारायण जाधव . बावधन बगाड यात्रा सुरू झाली असून 2025 यंदाचा बगाड्या होण्याचा बहुमान बावधन येथील अजित बळवंत ननावरे वय 39 व्यवसाय होमगार्ड यांना मिळाला आहे यावर्षी श्री काळभैरवनाथ मंदिरात होळी पौर्णिमे दिवशी नवस फेडण्यासाठी 44 नवस करी बसले होते त्यात दहावा नंबर अजित ननावरे यांचा होता नाथाने त्यांच्या नावाचा उजवा कौल दिल्याने 2025 यंदाचा बगाड घेण्याचा मान त्यांना मिळाला आहे बगाड्या अजित ननवरे यांनी 2014 ला आपला भाऊ सुनील याचा विवाह योग जुळून यावा यासाठी श्री काळभैरवनाथ चरणी नवस केला होता भाऊ सुनील याचा सोळा ला लग्न झाले त्यावेळीच बोललेला नवस पूर्ण झाला होता 2025 यंदा पहिल्यांदाच अजित हे नवस फेडण्यासाठी बसले नाथाने त्यांच्यावर कृपा वृष्टी दाखवली पहिल्या झटक्यातच बगाड्या होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला बावधन मधील बळवंत श्रीपती ननावरे व त्यांच्या पत्नी रत्‍नाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी फार मोठा संघर्ष केला ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारात कडधान्य विक्रीचा गेले चाळीस वर्षे व्यावसाय करून कुटुंबाचा गाडा चालवला त्यांना तीन मुलगे अनिल सुनील अजित ननावरे ह्या कुटुंबाची काळभैरवनाथावर अपार श्रद्धा व भक्ती आहे बगाड्या अजित यांनी मोठ्या भावाच्या कल्याणासाठी नाथा तुझं बगाड घेईन असा नवस केला ही आपल्या कुटुंबावर असणारे प्रेम माया औदार्य जीव मनापासून ची सद्भावना सर्वकाही पहावयास मिळते यावर्षी मंगळवार दिनांक 18 रोजी श्रीनाथाचा छबिना बुधवार दिनांक 19 रोजी रंगपंचमी दिवशी बगाड होईल व गुरुवार दिनांक 20 रोजी भाविकांच्या करमणुकीसाठी सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा व दुपारी जंगी कुस्त्यांचा फड असा भरगच्च बगाड यात्रा कार्यक्रम संपन्न होणार.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्टस, जलपर्यटनाला मंजुरी . आ शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश राज्य शासनाकडून ४५ . ३८ कोटी रुपये मंजुर .
आसणी ता . जावली येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .
Scroll To Top