Skip to content

सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी

IMG-20240912-WA0015

News By - Sahyadri_News

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून मिळवला निधी

सातारा / नारायण जाधव .

सातारा आणि जावली मतदारसंघातील २२ गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून ४ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणे’ या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगुडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी आणि पेट्री- अनावळे या १३ ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख म्हणजेच एकूण २ कोटी ६० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जावली तालुक्यातील कुंभारगणी, पानस, म्हाते बु., केसकरवाडी, वरोशी, बामणोली कसबे, मोहाट, मरडमुरे आणि नांदगणे या ९ ग्रामपंचायतींच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख असा एकूण १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून इमारत बांधकाम करण्याची मंजूर कामे तात्काळ सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..
जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..
Scroll To Top