Skip to content

मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्टस, जलपर्यटनाला मंजुरी . आ शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश राज्य शासनाकडून ४५ . ३८ कोटी रुपये मंजुर .

FB_IMG_1707231784370

News By - Narayan Jadhav

मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्ट्स, जलपर्यटनाला मंजुरी
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; राज्य शासनाकडून ४५.३८ कोटी रुपये मंजूर
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
सातारा- जावली मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु ठेवणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कोयना जलाशयावर मुनावळे ता. जावली येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली असून यासाठी ४५.३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
मुनावळे येथे शिवसागर जलाशयात उच्च दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यात यावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. या प्रकल्पाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून केले जाणार असून या प्रकल्पाचा पहिला टप्पा ८ महिन्यात आणि दुसरा टप्पा २० महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि ऍक्वाटीक टुरिझम म्हणजेच जलपर्यटन यांचा समावेश असून त्यासाठीचे संपूर्ण बांधकाम आणि सोयी- सुविधा उपलब्ध करणे या कामांचा प्रकल्पात समावेश असणार आहे.
या महत्वकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने जावली तालुक्यातील मुनावळे, कास, बामणोली या भागातील पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटनवाढीबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत आणि पर्यायाने स्थानिक अर्थव्यवस्था वाढीला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने जावलीतील पर्यटनाला एकप्रकारे नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे सातारा- जावली मतदारसंघातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..
जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..
Scroll To Top