Skip to content

मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..

IMG-20231218-WA0262

News By - Narayan Jadhav

मेढा महावितरणकडून भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम….
मेढा /नारायण जाधव .
वीज ग्राहकांचा वीजपुरवठा अधिकाधिक सुरळीत व्हावा यासाठी महावितरणचे प्रयत्न नेहमीच चालू असतात. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या मेढा शाखेकडून एक गाव एक दिवस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात भणंग ता. जावली गावातील विद्युत वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली.
महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा अधिकाधिक सुरळीतपणे मिळावा यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. याच संकल्पनेतून महावितरण साताराचे अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, वाई विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बोकील, मेढ्याचे उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण मेढा शाखेच्या माध्यमातून भणंग ता. जावली गावात या उपक्रमाचे आयोजन सोमवार (ता.१८) रोजी करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान भणंग गावाअंतर्गत असणाऱ्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. तसेच यावेळी गावातील विद्युत वाहिन्यांचे वाकलेले पोल सरळ करणे, लूज झालेल्या तारा ओढणे, पोलला ताण देणे, विद्युत वाहिन्यांच्या जवळची झाडे तोडणे, वितरण रोहित्रांची दुरुस्ती करणे तसेच नवीन कनेक्शन देणे व नादुरुस्त असलेले मीटर बदलणे इत्यादि कामे यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एक गाव एक दिवस उपक्रमादरम्यान केली.
यावेळी या उपक्रमात महावितरणचे शाखा अभियंता सुरेश कुंभार, प्रधान तंत्रज्ञ लीलाधर कारंडे, सूरज जाधव, ओंकार गोळे, महादेव शेलार, संजय पाटणे, तानाजी कदम यांच्यासह एच.व्ही.जी. इलेक्टरीकल्सची टीमने सहभाग घेतला होता.

चौकट:
‘एक गाव, एक दिवस’ या उपक्रमाअंतर्गत भणंग गावातील विद्युत वाहिन्यांची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. या उपक्रमाचा फायदा ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी होणार असून यापुढील काळात सुद्धा विविध गावात आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत. या उपक्रमाचे कौतुक गावातील नागरिकांनी सुद्धा केले आहे.
सुरेश अनंत कुंभार
शाखा अभियंता
महावितरण मेढा..

फोटो:भणंग: एक गाव एक दिवस उपक्रमादरम्यान मेढा महावितरणचे अधिकारी व कर्मचारी…

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आसणी ता . जावली येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
ग्राम सुरक्षा यंत्रनेमुळे तात्काळ मदत मिळणार .. डि .के. गोर्डे .
आपलेच जिवलग मित्र समुहाने जपली सामुहिक बांधिलकी .. फेसबुकवरील मित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ..
जावली तालुका पत्रकार संघ जावलीचे कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा . भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहिर ..
Scroll To Top