Skip to content

मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद .. आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी ..

IMG-20231029-WA0000

News By - Narayan Jadhav

*मराठा बांधवांच्या अभियानाला साताऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद*
*आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी ..
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवात केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. एक दिवस समाजासाठी या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शहर, उपनगर, तालुक्यातील हजारो ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलने सुरू झाली आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येऊ लागली असून तसे फ्लेक्स झळकले आहेत. काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्यावतीने बाईक रॅली, पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी सातारा शहर, उपनगर व तालुक्यातील विविध गावांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजातील नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करत एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, आंदोलकांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. मराठा लोकांकडे मोठी शेतजमीन असल्याचे सांगून अनेकजण दिशाभूल करत आहेत, परंतु, पूर्वीच्या काळात दोनशे एकर असणारी जमीन आता दोन गुंठ्यावर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. होतकरू आणि गुणवंत मराठा मुलांना संधी मिळत नसल्याने कुचंबणा होत आहे. आता तरी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा, मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ . शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना कॅबिनेट मंत्रीपद देवुन छत्रपत्रींच्या गादीचा सन्मान व्हावा – ज्ञानदेव रांजणे .
जावली तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे मार्गी लावली आहेत . तरीही विरोधी उमेदवाराला विकास दिसत नाही – आ शिवेंद्रसिहराजे भोसले .
केळघर येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाणे हद्दीतील मेढा बाजारपेठ , कुडाळ बाजारपेठ व करहर बाजारपेठेत रूट मार्च
उत्कृष्ठ कामगिरीबद्दल मेढा पोलीस स्टेशनचा सन्मान ..
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..
अमितदादांच्या मुळे राष्ट्रवादीत बेरजेचे राजकारण…-सुरेश पार्टे..
विकास सेवा सोसायट्यांनी उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावेत आ शिवेंद्रसिंहराजे भोसले .
सातारा- जावलीतील २२ ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ४.४० कोटी
आईच्या स्मृतिदिनी जि.प. शाळांना स्मार्ट टिव्ही
Scroll To Top