जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे यांची निवड ..

News By - Sahyadri_News
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर /नारायण जाधव .
जावली तालुका मंडलाधिकारी व तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी वरोशी ता . जावली सजाचे तलाठी श्री संदिप ढाकणे यांची निवड करण्यात आली .
मेढा . ता .जावली येथे संघटनेच्या कार्यालयात सेवानिवृत्त मंडलाधिकारी अनिस मेमन यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी अध्यक्षपदी श्री संदिप ढाकणे उपाध्यक्षपदी श्री सागर माळेकर तर सरचिटणीस पदी बाळासाहेब करचे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुदर्शन आशिवकर व सहसचिवदी सुरज माळी यांच्या निवडी सर्वानुमते पार पडल्या .
यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नुतन अध्यक्ष श्री संदिप ढाकणे यांनी सर्व पदाधिकार्यांना सोबत घेऊन संघटनेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले . नुतन पदाधिकाऱ्यांचे निवडी बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे .










