Skip to content

” एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न ..

IMG-20230917-WA0361

News By - Narayan Jadhav

“एक धाव बोंडारवाडी धरणासाठी मॅरेथॉन दौड संपन्न”…
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव . बोंडारवाडी धरणकृती समितीचे समन्वयक कै.विजयराव मोकाशी यांच्या स्मृतिदिनप्रीत्यर्थ मेढा ते केळघर या बारा किलोमीटर अंतरावरील मार्गावरून दौडचे आयोजन करण्यात आले होते. जावली करियर अकादमीच्या मुलानी व मुलांसह समितीच्या कार्यकर्त्यांनी यात समावेश घेतला होता.
मेढा येथील वेण्णा चौकात जावलीचे नायब तहसीलदार सुनील मुनाळे प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर वैद्यकिय अधिकारी डॉ. केदार कुलकर्णी आदिनाथ ओंबळे.डॉ सुप्रिया मुळे’ नारायण सुर्वे ,नारायण धनावडे, पत्रकार मोहन जगताप,विलास शिर्के, राजेंद्र जाधव , वैभव ओंबळे,यांनी झेंडा दाखवून दौंडचा शुभारंभ करण्यात आला.
मेढा ते केळघर मार्गावरील गावागावातील रस्त्यावर सुवासिनी व गावकर्‍यांनी दौडचे स्वागत केले. ठिकठिकाणचे युवक व युवती तरुण या दौडमध्ये गावोगावी सहभागी होत होते. केळघर ग्रामपंचायत हद्दीत बोंडारवाडी धरणकृती समितीच्यावतीने व विविध गावच्या सरपंच मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत केले जात होते. ही दौड यशस्वी करण्यासाठी बाजीराव धनावडे,बजरंग चौधरी, श्रीरंग बैलकर,उषा उंबरकर, जावली करीयर अकादमीचे संतोष कदम विष्णु डिगे, गेनूबुवा व संतोष बैलकर. सरपंच विजय सपकाळ. गणेश जगताप यांनी परिश्रम घेतले तर मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. सुप्रिया मुळे, आसमा शेख,संदीप बेलोशे व कर्मचारी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने करण्यात आले तर रामचंद्र मोरे यांनी आभार मानले. यावेळी बोंडारवाडी धरण कृती समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

श्री भैरवनाथ विद्या मंदिर केळघरचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश . .
मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्टस, जलपर्यटनाला मंजुरी . आ शिवेद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश राज्य शासनाकडून ४५ . ३८ कोटी रुपये मंजुर .
आसणी ता . जावली येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील : डॉ . भीमराव आंबेडकर ..
सत्ता आल्यास भारतीय बौद्ध महासभेची कामे होतील डॉ . भीमराव आंबेडकर ..
यशवंत कारंजकर यांचे दुखःद निधन .
नांदगणे गावच्या विकासासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशिल असुन भविष्यातही येथील विकास कामे आ . शिवहरसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन होतील .. युवा उद्योजक सागर धनावडे .
समाजसेवक श्री ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
मेढा महावितरण कडुन भणंग गावात एक गाव एक दिवस उपक्रम ..
बोंडारवाडी धरणासाठी महिलाचा एल्गार ….
Scroll To Top