Skip to content

केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकार्ऱ्यांवर कारवाई करा ..अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा . राष्ट्रवादी युवक काँग्रेसे युवा नेते .. संकेत पाटील . .

IMG-20230914-WA0745

News By - Narayan Jadhav

केळघर येथील उर्वरीत लेनचे काम पूर्ण करा व कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा .. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते ..संकेत पाटील .
*सहयाद्री न्युज स्टार ११*
केळघर ( नारायण जाधव )
महाबळेश्वर ते विटा या प्रमुख राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठे सह परिसरात उर्वरीत लेनचे काम अपूर्ण असुन याचा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनसह परिसरातील वाहन चालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असुन या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संकेत पाटील यांनी दिला आहे .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले त्यांनी निवेदनात म्हटले आहे की केळघर येथील उर्वरीत रखडलेल्या लेनचे काम तातडीने पूर्ण करावे केळघर बाजार पेठेत रहदारीच्या ठिकाणी स्पिड ब्रेकर लावण्यात यावेत . शाळेच्या जवळ स्पिड ब्रेकर व सुचना फलक लावण्यात यावेत
ठिकठिकाणी ड्रिनेज उघडे असलेने परिसरात दुर्गंधी पसरली असुन ते झाखण्यात यावीत व रखडलेली सर्व कामे नियमानुसार लवकर पूर्ण करावीत अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने युवा नेते संकेत पाटील यांनी केली आहे .
यावेळी राट्रवादीचे सचिन सावले, समिर झोरे, श्रीकांत पाडळे, आमन चहाण, ऋषी शेलार, राजु सुतार यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री . डी . एच . पवार यांनी लवकरच केळघर येथील रस्ताचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

मराठा आरक्षणासाठी मेळ्यात बंद .. लाठीचार्जचा केला निषेद . संमिश्र प्रतिसाद ..
मेढा आठवडा बाजार बसला मेढा – कुडाळ घाटात .. मालदेव मंदिर जवळ पहिल्यांदाच बाजार …
शिवाजी खांडेकर हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करतील ..
लोक शेतात भांगलायला जातात . मराठा समाजाची परिस्थिती बघा .. उदयनराजे भोसले .
कास पठाराच्या फुलांचा हंगामाचा आज खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शुभारंभ .
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई उदयनराजेंची भेट .
सुपोषित , साक्षर व सक्षम भारत घडविण्यासाठी सर्वांची गरज .. दिपक ढेपे ..
यंदाचा कास पठार हंगाम सुरु होण्यापुर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ..
मैत्रीदिनी ” एक झाड मैत्रीच” हा संदेश देत डांगरेघरमध्ये वृक्षारोपण .. मित्रमेळा फाउंडेशन व डांगरेघर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ..
जावली तालुक्यात वृक्षतोडीवर बंदी घालावी यासाठी तहसिलदार व वनक्षेत्रपाल यांना निवेदन ..
Scroll To Top